Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

मुक्ता बर्वेचं 'ब्रेव्ह' रिटर्न गिफ्ट

चित्रपटांइतकीच रंगभूमीवरही यशस्वीपणे वावरणाऱ्या मुक्तानं वाढदिवसाच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 'बंदिशाळा' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आजच लाँच करण्यात आला आहे.

मुक्ता बर्वेचं 'ब्रेव्ह' रिटर्न गिफ्ट
SHARES

सर्वांगसुंदर अभिनयानं तमाम मराठी प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस आहे. याच दिवशी 'बंदिशाळा' या चित्रपटातील मुक्ताचं 'ब्रेव्ह' रूप समोर येणं हे जणू तिच्या चाहत्यांना मिळालेलं रिटर्न गिफ्टच आहे.


ट्रेलर लाँच

आज वाढदिवस असल्यानं मुक्तावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चित्रपटांइतकीच रंगभूमीवरही यशस्वीपणे वावरणाऱ्या मुक्तानं वाढदिवसाच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 'बंदिशाळा' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आजच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात मुक्तानं एका डॅशिग तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका साकारली असल्यानं तिचं धाडसी रूप पहायला मिळत आहे. स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पेटून उठत गुन्हेगारांना योग्य ते शासन घडवण्यासाठी धडपडणाऱ्या एका तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका या चित्रपटात मुक्तानं साकारली आहे. 


बिनधास्त पोलीस अधिकारी

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे. महिलांच्या सुरक्षेचं हे विदारक सत्य आणि भयानक परिस्थिती दाखवणारा 'बंदिशाळा'चा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भोंग्याच्या आवाजानं भयभीत झालेल्या सुरक्षा रक्षकांची उडणारी तारांबळ आणि त्या भयंकर परिस्थितीच कुठलंही दडपण न घेता बिनधास्तपणं त्या दंगलीला भिडणारी पोलीस अधिकारी माधवी सावंत ट्रेलरमध्ये दिसते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनून बेधडकपणे करारी मुक्ता उसळलेल्या दंगलीत घुसून दंगलखोरांना आपला इंगा दाखवताना दिसते. 


न पाहिलेला अवतार 

मुक्ताचे अॅक्शन सीन खूप छान आहेत. रुबाबदार पोलिसी वर्दीतल्या मुक्तानं गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्याचा विडा उचलल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. तुरुंग अधिक्षिका माधवी सावंत ही सक्षम तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका तिनं या चित्रपटात रंगवली असून, यापूर्वी कधीही न पाहिलेला तिचा अवतार पहायला मिळणार आहे. 'जोगवा', 'पांगिरा', 'बहात्तर मैल – एक प्रवास', 'दशक्रिया' या आशयघन चित्रपटानंतर लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनी 'बंदिशाळा'चं लेखन केलं आहे. 


मिलिंद लेलेंचं दिग्दर्शन 

दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात उमेश जगताप, शरद पोंक्षे, विक्रम गायकवाड, हेमंगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अनिल नगरकर, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, विश्वजित देशपांडे, अशोक केळकर, पुंडलिक पालवे, उमेश बोलके, बालकलाकार आर्या घारे, सई खेडेकर सोबत पाहुणी कलाकार कृतिका गायकवाड यांच्या विशेष भूमिका आहे.

मुंबई लाइव्ह टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

लिंक - https://www.youtube.com/watch?v=_diRJD7Faswहेही वाचा  -

प्रथमेश-मिलिंदचं ‘टकाटक’ पोस्टर पाहिलं का?

प्रीतमचा डबल धमाका
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा