Advertisement

प्रथमेश-मिलिंदचं ‘टकाटक’ पोस्टर पाहिलं का?

दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. पदार्पणातच ‘येड्यांची जत्रा’सारखा करमणूकप्रधान चित्रपट बनवणारा मिलिंद ‘अॅडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपट बनवत असल्याची बातमी आम्ही फार पूर्वीच आपल्याला दिली होती.

प्रथमेश-मिलिंदचं ‘टकाटक’ पोस्टर पाहिलं का?
SHARES

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावत असलेला मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब आता एका ‘टकाटक’ भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.


पहिलं पोस्टर प्रदर्शित 

दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. पदार्पणातच ‘येड्यांची जत्रा’सारखा करमणूकप्रधान चित्रपट बनवणारा मिलिंद ‘अॅडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपट बनवत असल्याची बातमी आम्ही फार पूर्वीच आपल्याला दिली होती. नंतर या चित्रपटाचं शीर्षक बदलून ‘हृदयी वसंत फुलताना’ असं करण्यात आलं होतं. आता हा चित्रपट ‘टकाटक’ या शीर्षकांतर्गत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचंच पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.


सेक्स काॅमेडी

या चित्रपटाद्वारे मिलिंदनं सेक्स काॅमेडी हा प्रकार मराठी प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, त्याची जोडी ऋतिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. याशिवाय या चित्रपटात प्रथमेश-ऋतिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत. पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही, पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ची निर्मिती करण्यात आली आहे.


२८ जून रोजी प्रदर्शित 

ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे. मिलिंदनं निर्माते अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी संवादलेखन केलं असून, जय अत्रे यांनी गीतलेखन केलं आहे. हा चित्रपट २८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी प्रेक्षकांनी आपल्या मातृभाषेतील चित्रपटांमध्ये फारसा न पाहिलेला सेक्स कामेडी हा प्रकार ते कशा प्रकारे स्वीकारतात हे पाहण्याजोगं ठरेल.



हेही वाचा -

सयाजीसोबत नवोदित पूजाचा 'तांडव'

मराठीसाठी पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली !




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा