Advertisement

मराठीसाठी पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली !

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसोबतच संगीतप्रेमींसाठी गुरविंदर सिंग हे नाव अनोळखी नाही. गुरविंदरनं फगवारा येथील लव्हली युनिव्हर्सिटीच्या स्पेक्ट्रा कॉम्पिटिशनमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे.

मराठीसाठी पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली !
SHARES

संगीताला भाषेचं बंधन नसतं हे आजवर बऱ्याच गायक-संगीतकारांनी दाखवून दिलं आहे. याच परंपरेचा पाईक बनत पंजाबी गायक गुरविंदर सिंगनं चक्क मराठी चित्रपटासाठी उर्दू भाषेत कव्वाली गायली आहे.


सावधान, पुढे गाव आहे

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसोबतच संगीतप्रेमींसाठी गुरविंदर सिंग हे नाव अनोळखी नाही. गुरविंदरनं फगवारा येथील लव्हली युनिव्हर्सिटीच्या स्पेक्ट्रा कॉम्पिटिशनमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे. २०१७ मध्ये  ऑल इंडिया रेडियोच्या सुगम संगीत स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. २०१३ मध्ये 'व्हॉइस ऑफ पंजाब' या सिंगिंग रिऍलिटी शोमध्येमध्ये गुरविंदरनं दुसरा क्रमांक पटकावला असून, झी टीव्हीवरील 'सारेगमप'मध्ये तो शेवटच्या सात जणांमध्ये होता. त्यानं रमाझ म्युझिक कंपनीसाठी गायलेलं 'जान मेरी...' हे पंजाबी गाणं खूपच गाजलं. करियरच्या सुरुवातीलाच बक्षिसांचा वर्षाव झालेल्या गुरविंदरनं 'सावधान, पुढे गाव आहे' या मराठी चित्रपटात उर्दू कव्वाली गायली आहे.


अनोखा योगायोग 

शीर्षक आणि कथेप्रमाणंच 'सावधान, पुढे गाव आहे' या चित्रपटाचे संगीतही अनोखे आहे. सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलेलं आहे. या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी रितेशकुमार नलिनी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातील कव्वालीसाठी त्यांना तरुण दमाचा गायक हवा होता. त्यासाठी मग त्यांनी गुरबिंदर सिंगशी संपर्क साधला आणि एका मराठी चित्रपटासाठी उर्दू शब्द असलेली कव्वाली पंजाबी गायकाच्या आवाजात ध्वनिमुद्रित होण्याचा अनोखा योगायोग जुळून आला.


गावाकडे परतण्यासाठी साद 

'सावधान, पुढे गाव आहे' या चित्रपटाचं दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केलं आहे. शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाचा विषयही खूप वेगळा आणि आजवर कधीही समोर न आलेला असा आहे. उन्हाच्या तीव्र झळा झेलाव्या लागत असल्यामुळं हिरव्या निसर्गाची मनुष्याला आठवण येत आहे. अशाच विचारधारेला धरून व शहरात बसलेल्यांना गावाकडे परतण्यासाठी साद घालणारा 'सावधान, पुढे गाव आहे' हा चित्रपट आहे.



हेही वाचा- 

शेवंताच्या 'रात्रीस खेळ चाले'ची सेंच्युरी

'चेहरे' चित्रपटातील अमिताभ यांचा फर्स्ट लूक पाहिलात का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा