Advertisement

'आंबेडकर' मालिकेसाठी शिवानी बनली रमाबाई

बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत छोट्या पडद्यावर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत रमाबाई आंबेडकरांची व्यक्तिरेखा शिवानी रांगोळे साकारत आहे.

'आंबेडकर' मालिकेसाठी शिवानी बनली रमाबाई
SHARES

बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत छोट्या पडद्यावर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत रमाबाई आंबेडकरांची व्यक्तिरेखा शिवानी रांगोळे साकारत आहे.


गुपित उघड

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर प्रथमच डॅा. बाबासाहेब अवतरले आहेत. या मालिकेत अमिनेता सागर देशपांडे टायटल रोल साकारणार असल्याचं मागील बऱ्याच दिवसांपूर्वी सर्वांना समजलं होतं, पण त्याच्या जोडीला रमाबाई कोण बनणार हे गुपित मात्र उलगडण्यात आलं नव्हतं. आता मात्र हे गुपित उघड झालं आहे. या मालिकेत रमाबाईंच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे.

ऐतिहासिक व्यक्तिरेखा

दलित-मागासवर्गीय जनतेचं दैवत म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब प्रथमच छोट्या पडद्यावर अवतरल्यानं त्यांच्या अनुयायांसोबतच इतरांचंही लक्ष या मालिकेनं वेधून घेतलं आहे. मोठ्या पडद्यावर पु. ल. देशपांडेंची भूमिका यशस्वीपणं साकारल्यानंतर सागर छोट्या पडद्यावर बाबासाहेबांची भूमिका कशा प्रकारे साकारतोय याकडंही सर्वांचं लक्ष आहेच, पण त्याहीपेक्षा आजवर नेहमीच मॅाडर्न भूमिकेत दिसलेली शिवानी रमाबाईंची ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत असल्यानं तिच्यावरही बारीक लक्ष राहणार आहे. 


फोटो शेअर 

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत रमाबाई कोण साकारणार या प्रश्नाचं उत्तर शिवानीनं स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे. शिवानीनंच आपले रमाबाईंच्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'एखादं सशक्त ऐतिहासिक पात्र साकरण्याचं नेहमीच माझं स्वप्न होतं आणि माझं स्वप्न साकार झालं आहे. मला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत रमाबाई साकारायची संधी मिळाली आहे. या प्रवासाचा मी भाग होऊ शकले याचा मला प्रचंड आनंद आहे. रमाबाईंकडून किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे मला हळूहळू जाणवत आहे', असं शिवानीनं या फोटोंसोबत लिहिलं आहे. 


बाबासाहेबांची सावली

बाबासाहेबांच्या जीवनप्रवासात आणि त्यांच्या कार्यात रमाबाईंचं खूप मोठं योगदान होतं. ज्या काळी महिलांना केवळ चूल आणि मूल यापलीकडं काही ठाऊक नव्हतं त्या काळी रमाबाईंनी पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वत: ला समाजसेवेत झोकून दिलं. त्यासोबतच बाबासाहेबांचा संसारही योग्य तऱ्हेनं सांभाळत त्याला आकार दिला. नेहमीच बाबासाहेबांच्या मागं ठामपणं उभ्या ठाकणाऱ्या रमाबाईंनी वेळप्रसंगी स्वत:चे दागिनेही गहाण ठेवले. बाबासाहेबांची सावली बनलेल्या या माऊलीची कथाही या मालिकेच्या निमित्तानं घराघरात पोहोचणार आहे.



हेही वाचा -

दारूच्या नशेत 'झिंगत' रिंकू देतेय शिव्या!

EXCLUSIVE : बाबो! अमोल कागणेला मराठीतच सावत्र वागणूक; चित्रपटात असूनही वगळलं नाव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा