Advertisement

'लागिरं झालं जी'मधला साधाभोळा विक्या झाला खलनायक!


'लागिरं झालं जी'मधला साधाभोळा विक्या झाला खलनायक!
SHARES

छोट्या पडद्यावरच्या 'लागिरं झालं जी' मालिकेमधला विक्या आठवतोय? अर्थात विक्रांत? आठवणारच...सध्या घराघरात ही मालिका लोकप्रिय झाली असून त्यातली पात्रही प्रेक्षकांच्या आयुष्याचाच जणू एक भाग बनली आहेत. त्यातही साधाभोळा स्वभाव असणारा विक्या सगळ्यांच्याच लक्षात रहातो. पण आता हा साधाभोळा विक्या व्हिलन होणार आहे.



विक्या अर्थात निखिल चव्हाण मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आर.पी. प्रॉडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटातून निखिल मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनीष चौधरी ही खलनायकाची व्यक्तिरेखा विक्या ‘अॅट्रॉसिटी’मध्ये साकारतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन दीपक कदम यांनी केलं आहे.

चित्रपटामध्ये काम करण्याचा माझा अनुभव कमालीचा आहे. मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी मी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. उत्तम कथानक असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’च्या निमित्ताने मला चांगली भूमिका मिळाली असून या चित्रपपटाबाबत मी खूप उत्सुक आहे.

निखिल चव्हाण, अभिनेता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा