Advertisement

अमेय वाघ 'महाराष्ट्राचा फेव्हरेट'! 'फास्टर फेणे' ठरला अव्वल!


अमेय वाघ 'महाराष्ट्राचा फेव्हरेट'! 'फास्टर फेणे' ठरला अव्वल!
SHARES

मराठी व्युअर्स चॉईस अवॉर्ड्स म्हणजेच 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१७' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सिनेसृष्टीतील ख्यातनाम कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. २०१७ मधील मराठी सिनेमांचा गौरव यावेळी करण्यात आला.



सोहळ्यात बहारदार परफॉर्मन्सने रंगत!

वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्यांच्या ओघवत्या आणि मिश्किल सूत्रसंचालनाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, शरद केळकर, प्राजक्ता माळी यांच्या बहारदार परफॉर्मन्सेसने या सोहळ्यात अजूनच रंगत आणली.




फास्टर फेणेच ठरला 'फास्ट'!

या सोहळ्यात बाजी मारली ती झी टॉकीज निर्मित आणि आदित्य दिग्दर्शित 'फास्टर फेणे' या चित्रपटाने! फास्टर फेणेने तब्बल चार पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. प्रेक्षकांनीही 'फास्टर फेणे' या चित्रपटाला सर्वाधिक पसंती दर्शवली. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता' आणि 'स्टाईल आयकॉन' हे पुरस्कार अमेय वाघला मिळाले आहेत. तर आदित्य सरपोतदार हा 'महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक' ठरला आहे. तर गिरीश कुलकर्णीला याच चित्रपटासाठी 'फेव्हरेट खलनायक'चा पुरस्कार देण्यात आला. तर '२०१७ चा फेव्हरेट चित्रपटा'चा मान ही 'फास्टर फेणे'ला मिळाला.



हे आहेत महाराष्ट्राचे फेव्हरेट!

महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट - फास्टर फेणे
महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक - आदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)
महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता - अमेय वाघ (फास्टर फेणे)
महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री - सई ताम्हणकर (जाऊं द्या ना बाळासाहेब)



महाराष्ट्राचा फेव्हरेट सहाय्यक अभिनेता - सचिन खेडेकर (मुरांबा)
महाराष्ट्राची फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री - शिल्पा तुळसकर (बॉईज)
महाराष्ट्राचा फेव्हरेट खलनाय - गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)

महाराष्ट्राचा फेव्हरेट नवोदित अभिनेता - अभिनय बेर्डे (ती सध्या काय करते)
महाराष्ट्राची फेव्हरेट नवोदित अभिनेत्री - आर्या आंबेकर (ती सध्या काय करते)
महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन - अमेय वाघ
महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस - सई ताम्हणकर
महाराष्ट्राचे फेव्हरेट गीतहृदयात वाजे समथिंग (ती सध्या काय करते)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा