Advertisement

‘उतरंड’च्या मेकर्सना लागले कॉमेडीपटाचे वेध

काही सिनेमे आधी देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये गाजतात आणि नंतर रसिकांच्या भेटीला येतात. लघुपटांना मात्र असा पर्याय नसतो. त्यामुळंच देश-विदेशातील महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘उतरंड’च्या फिल्ममेकर्सना कॉमेडीपटाचे वेध लागले आहेत.

‘उतरंड’च्या मेकर्सना लागले कॉमेडीपटाचे वेध
SHARES

काही सिनेमे आधी देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये गाजतात आणि नंतर रसिकांच्या भेटीला येतात. लघुपटांना मात्र असा पर्याय नसतो. त्यामुळंच देश-विदेशातील महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘उतरंड’च्या फिल्ममेकर्सना कॉमेडीपटाचे वेध लागले आहेत.

वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या 'उतरंड' या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येणार आहेत. झेब्रा एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेनं पर्यावरणाचं महत्व अधोरेखित करत २०१६ मध्ये ‘उतरंड’ या एका समाजप्रबोधनपर लघुपटाची निर्मिती केली होती. या लघुपटाला मागील दोन वर्षांमध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये विविध पुरस्कार मिळाले आहेत. आता झेब्रा एंटरटेन्मेंट लाइट हार्टेड कॉमेडी मराठी सिनेमा बनवण्यासाठी सज्ज झालं आहे.

याविषयी बोलताना झेब्रा एंटरटेन्मेंटचे निर्माते संजय गोळपकर म्हणाले की, आम्ही आमच्या निर्मिती संस्थेच्या स्थापनेनंतर ‘उतरंड’ या लघुपटाची निर्मिती केली. ‘उतरंड’ला विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाल्यानं आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहोत. पदार्पणात एक निखळ मनोरंजनपर सिनेमा रसिकांच्या सेवेत रुजू करण्याची योजना आहे. संगीत दिग्दर्शक आणि गीतकार गणेश-सुरेश या जोडीनं ‘उतरंड’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनीच आमच्या नव्या सिनेमाची कथाही लिहीली आहे. लवकरच या सिनेमाचं शीर्षक आणि स्टारकास्टची घोषणा करू. हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची योजना आहे.



हेही वाचा -

सई ताम्हणकर पुन्हा दिसणार धाडसी भूमिकेत

तेजस्वीनीची दैवी रूपं पाहिली का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा