Advertisement

सई ताम्हणकर पुन्हा दिसणार धाडसी भूमिकेत

आमिर खानच्या ‘गजनी’नंतर ‘सनई चौघडे’द्वारे मराठीत दाखल झालेल्या सई ताम्हणकरनं आपल्या चाहत्यांना कायम वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन दिलं आहे. आता पुन्हा एकदा ती नव्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सई ताम्हणकर पुन्हा दिसणार धाडसी भूमिकेत
SHARES

आमिर खानच्या ‘गजनी’नंतर ‘सनई चौघडे’द्वारे मराठीत दाखल झालेल्या सई ताम्हणकरनं आपल्या चाहत्यांना कायम वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन दिलं आहे. आता पुन्हा एकदा ती नव्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नाती आणि ती सांभाळण्याच्या जबाबदारीला आपणा सर्वांच्या जीवनात खूप महत्त्व असतं. बरं यातही प्रत्येक नात्याची वेगळी जबाबदारी सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. अशाच काही नात्यांचा उलगडा करणारा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्याच्या वळणावर येणाऱ्या वेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणाऱ्या या सिनेमाचं शीर्षक आहे ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’. या सिनेमातच सईचं धाडसी रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिला आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिनं पेहराव बदलला, तिनं घर बदललं, तिनं नोकरी बदलली, तिनं अॅटिट्युड बदलला, तिनं नवरा बदलला, तिनं मित्र बदलला, तिनं तिचं जगणं बदललं, पण तिचं जगणं बदललं का? ते या सिनेमात पहायला मिळेल.

चित्रपटांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून अनुभवयाला मिळेल. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे, या पोस्टरमध्ये दाखवल्यानुसार सई ताम्हणकर मुलगी, पत्नी, आई आणि प्रेयसी या अनेक नात्यांमध्ये दिसणार आहे. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे. झपाट्यानं बदलणाऱ्या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

तेजस्वीनीची दैवी रूपं पाहिली का?

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन
संबंधित विषय
Advertisement