Advertisement

तेजस्वीनीची दैवी रूपं पाहिली का?

बरेच कलाकार सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतनं दैवी रूपं धारण केली आहेत.

तेजस्वीनीची दैवी रूपं पाहिली का?
SHARES

बरेच कलाकार सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतनं दैवी रूपं धारण केली आहेत.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत तेजस्वीनी पंडीतनं एक अनोखा प्रयोग करत सर्वांना आश्चर्याचा जणू धक्का दिला आहे. पहिल्या दिवशी तिनं थेट देवीचं रूप धारण केलेलं फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आपल्या चाहत्यांसोबतच संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला आश्चर्यचकीत केलं. हाच प्रयोग तिनं दुसऱ्या दिवशीही केला आणि सर्वच स्तरांतून तेजस्वीनीवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. तेजस्वीनीचे हे दोन्ही लुक्स ‘मुंबई लाइव्ह’च्या प्रेक्षकांसाठी…

पहिल्या दिवशी तेजस्वीनीनं कोल्हापूरच्या अंबाबाईचं म्हणजेच महालक्ष्मीचं रूप धारण केलं. महालक्ष्मीची मूर्ती काळ्या पाषाणाची असल्यानं तेजस्वीनीनं तशाच प्रकारचा मेकअप केला होता. कपाळावर भरलेला हळदीचा मळवट आणि त्यावर असलेला कुंकवाचा टिळा साक्षात महालक्ष्मीची आठवण करून देणारा आहे. याला नाकातील नथ, गळ्यातील कोल्हापुरी साज, बोर माळ आणि कानातील झुमक्यांची उत्तम साथ मिळाली होती. दुसऱ्या दिवशी तेजस्वीनीनं कामाख्या देवीचं रूप धारण करून देशात अत्याचाराला दररोज बळी पडणाऱ्या स्त्रियांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तेजस्वीनीला या गेटअपमध्ये पाहिल्यावर भविष्यात तिला देवीच्या भूमिका साकारण्याची आॅफर मिळाली तर नवल वाटणार नाही.हेही वाचा -

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन

'या' दिवशी 'तारक मेहता...’ मालिकेत होणार दयाबेनची वापसी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा