Advertisement

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन


ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन
SHARES

'अशी ही बनवा बनवी' या मराठी चित्रपटात अतिशय छोट्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं असून, ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

'कालिया'ची भूमिका 

मराठी कलाकार विजू खोटे यांनी 'शोले' या सुप्रसिद्ध चित्रपटात 'कालिया'ची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमीका जबरदस्त गाजली होती. तसंच, या चित्रपटातील गब्बर जेव्हा कालियाला विचारतो 'अबे ओ कालिया, तेरा क्या होगा?, 'कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं' हा संवाद प्रचंड गाजला होता. आजही शोले चित्रपटातील हा संवाद प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 'शोले'सह 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील त्यांची 'रॉबर्ट'ची भूमिकाही गाजली. 

छोट्या भूमिका 

विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसंच, विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्यानं त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत.हेही वाचा -

मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?

हतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत?Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement