Advertisement

मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?

राज्यात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे १०० ते १२५ उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा सध्या रजकीय वर्तुळात सुरू आहे.

मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व अमित शाह यांना मतदान करू नका असं आवाहन त्यांना केलं होतं. मात्र आता, राज्यात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे १०० ते १२५ उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा सध्या रजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसे येत्या काही दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, ५ ऑक्टोबरला मनसे प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुका आता फक्त २१ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हालचाल दिसत नसल्यानं मनसे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. तसंच, येत्या काही दिवसांत त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

प्रचाराचा नारळ 

५ ऑक्टोबरला राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार असून त्यांची पहिली सभा कुठे होणार, याबाबत अद्याप माहिती अस्पष्ट आहे. त्याशिवाय, मनसे निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या प्रचाराचा रोख नेमक्या कोणत्या दिशेनं असणार, पुन्हा ते भाजपलाच ठोकणार की त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीही असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत येणार भूमिगत कचरापेट्या, महापालिकेचा प्रयोग यशस्वी

पीएमसी बँक प्रकरणातून घ्या 'हा' धडा, अशी करा आपली गुंतवणूक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा