Advertisement

'या' दिवशी 'तारक मेहता...’ मालिकेत होणार दयाबेनची वापसी

दिशानं सिरियलच्या सुरुवातीपासून दयाबेन ही भूमिका पार पाडली होती. पण गरोदर असल्यानं कार्यक्रमातून सुट्टी घेतली होती. मध्यंतरी दोन तीन भागात दिशा पुन्हा सीरियलमध्ये दिसली होती.

'या' दिवशी 'तारक मेहता...’ मालिकेत होणार दयाबेनची वापसी
SHARES

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता मालिकेत पुन्हा एकदा टप्पू के पापा हा आवाज ऐकू येणार आहे. अगदी बरोबर ओळखलंत. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी पुन्हा एकदा मालिकेत पदार्पण करत आहे. आहे का नाही दयाबेनच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी


कधी येणार दयाबेन?

दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी हिनं चाहत्यांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून दिशा शिवाय ही मालिका सुरू आहे. पण दयाबेन मालिकेत नसल्यामुळे तिचे चाहते नाराज होते. अखेर दयाबेन पुन्हा वापसी करत आहे. नवरात्रीच्या विशेष भागातूनच दया मालिकेत पुन्हा एंट्री घेणार आहे.


मतभेद दूर

मागील काही काळापासून सतत सिरियलचे निर्माते आसित मोदी आणि दिशा वकानी यांच्यात कामाच्या अटींवरून मतभेद असल्याचं समोर येत होतं. मात्र आता अखेरीस या दोघांचं एक मत होऊन दिशानं निर्मात्यांच्या अटींवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे.


नेमकं प्रकरण काय ?

दिशानं सिरियलच्या सुरुवातीपासून दयाबेन ही भूमिका पार पाडली होती. पण गरोदर असल्यानं कार्यक्रमातून सुट्टी घेतली होती. मध्यंतरी दोन तीन भागात दिशा पुन्हा सीरियलमध्ये दिसली होती. मात्र त्यानंतर ती पुन्हा गायब झाली. त्यानंतर मात्र तिला रिप्लेस करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दयाबेनच्या भूमिकेसाठी अमी त्रिवेदी, विभूती शर्मा यांच्या नावांची चर्चा देखील सुरू होती



हेही वाचा

'हाऊसफुल ४' चा धमाकेदार ट्रेलर लाँच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा