Advertisement

कोण आहे अमेयची 'गर्लफ्रेंड'?

मागील काही दिवसांपासून अभिनेता अमेय वाघ सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. त्यानं आपल्या चाहत्यांकडून मदत मागत मुलीसाठी नाव सुचवण्याचं आवाहन केलं होतं.

कोण आहे अमेयची 'गर्लफ्रेंड'?
SHARES

मागील काही दिवसांपासून अभिनेता अमेय वाघ सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. त्यानं आपल्या चाहत्यांकडून मदत मागत मुलीसाठी नाव सुचवण्याचं आवाहन केलं होतं. यातून बरेच गैरसमजही झाले होते, पण आता समजलं आहे की, तो आपल्या गर्लफ्रेंडसाठी नाव विचारत होता. त्यानंतर आता त्याची गर्लफ्रेंड आहे तरी कोण? हा प्रश्न अनेकांना सतावू लागला आहे.

मदत मागितली

अमेयनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'जरा मदत हवीय तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!' असं आवाहन केलं होतं. त्यानंतर 'दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा!' अशी पोस्ट टाकली होती. या दोन्ही पोस्टमुळं अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत होते, मात्र या दोन्ही पोस्ट अमेयच्या आपल्या आगामी मराठी चित्रपटासंबधी असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. अमेयची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं शीर्षक 'गर्लफ्रेंड' आहे. 


मनात कुतूहल

या चित्रपटाशी प्रेक्षकांनी जोडलं जावं आणि त्यांच्या मनात याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं यासाठी अमेयनं या पोस्ट टाकल्या होत्या. या दोन्ही पोस्टनं आपलं काम चोख बजावलं. अमेयला खूप रिप्लाय आले आणि या पोस्टची खूप चर्चाही रंगली. त्यानंतर आता मात्र अमेयच्या नव्या चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड नक्की कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात अमेयनं साकारलेल्या तरुणाचं नाव नचिकेत असून, त्याच्या गर्लफ्रेंडचं आणि 'गर्लफ्रेंड'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

अमेयनं यापूर्वी बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 'मुरांबा'मध्ये मिथीला पालकर आणि 'फास्टर फेणे'मध्ये पर्ण पेठेसोबत त्याची जोडी जमली होती. आता त्याची नवी गर्लफ्रेंड कोण असणार? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. यापूर्वी 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'मुरांबा', 'YZ' या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी 'गर्लफ्रेंड' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उपेंद्र सिधये यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. अमेय सध्या मुंबईत एका हिंदी वेबसिरीजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.हेही वाचा-

सलमान बनणार ‘कुंवारा बाप’?

रोहितच्या संगीताची ‘मनमोहिनी…’ ऐकली का?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा