Advertisement

रोहितच्या संगीताची ‘मनमोहिनी…’ ऐकली का?

झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप - लिटील चॅम्प्स’द्वारे नावारूपाला आल्यानंतर लातूरच्या रोहित राऊतनं पार्श्वगायनातही आपलं नाव कमावलं. आता त्यानं संगीतबद्ध केलेलं ‘मनमोहिनी…’ हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.

रोहितच्या संगीताची ‘मनमोहिनी…’ ऐकली का?
SHARES

झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप - लिटील चॅम्प्स’द्वारे नावारूपाला आल्यानंतर लातूरच्या रोहित राऊतनं पार्श्वगायनातही आपलं नाव कमावलं. आता त्यानं संगीतबद्ध केलेलं ‘मनमोहिनी…’ हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.


रोहित संगीतकार बनला

मराठी रसिकांचा लाडका गायक रोहित राऊत संगीतकार बनला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी चित्रपटात रोहितनं संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील ‘मनमोहिनी…’ हे गाणं रोहितनं संगीतबद्ध केलं आहे. अभिषेक कणखर यांनी लिहिलेलं हे गाणं रोहितनं स्वत: गायलंही आहे.


रोमँटिक गाणं

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिला पाहिल्यावर ती आपली 'मनमोहिनी' आहे असं वाटतं. असाच काहीसा आभास निर्माण करणारं 'मनमोहिनी…' हे रोमँटिक गाणं आहे. या गाण्यामध्ये सई देवधर स्वप्नील जोशीची मनमोहिनी बनली आहे. ‘मनमोहिनी आज पाहिली, छबी तिची पाहता मनी राहिली...’ असे बोल असलेलं हे गाणं प्रेक्षकांना आपल्या मनमोहिनीची आठवण करून देईल यात काही शंका नाही. कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.


सुंदर कथा

‘मनमोहिनी..’ या गाण्याचं संगीत दिग्दर्शन करण्याबाबत रोहित म्हणाला की, ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करताना एक वेगळाच अनुभव आला. एका सुंदर कथेवर आधारलेल्या सिनेमासाठी काम करायला मिळणं हे खूपच अनपेक्षित होतं. याकामी श्रावणी देवधर यांचं खूप सहकार्य लाभलं. कारण मला असं वाटत की, एखादं गाणं संगीतकाराला सुचवण्याआधी ते गाणं कोणत्या परिस्थितीला हवंय हे त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुचणं गरजेचं असतं. त्यामुळं संगीत दिग्दर्शक अचूक गाणं बनवू शकतो.


निर्माते अर्जुनसिंग बरन, कार्तिक निशाणदार

या चित्रपटामध्ये स्वप्नील-सईच्या जोडीला चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘जीसिम्स’च्या अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


लिंक  - https://youtu.be/nupRXVEz4DYहेही वाचा -


सई-ललित-पर्णची 'मीडियम स्पाइसी' रेसिपी!

अमिताभ मराठी चित्रपटात


संबंधित विषय
Advertisement