Advertisement

सई-ललित-पर्णची 'मीडियम स्पाइसी' रेसिपी!

अलिकडच्या काळात 'लव्ह सोनिया', 'डेट विथ सई' या वेबसिरीजमुळं चर्चेत असलेली सई ताम्हणकर, 'आनंदी गोपाळ' या चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तिरेखा रंगवणारा ललित प्रभाकर आणि बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी पर्ण पेठे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

सई-ललित-पर्णची 'मीडियम स्पाइसी' रेसिपी!
SHARES

मागील काही वर्षांपासून मराठीत इंग्रजी टायटल असलेल्या चित्रपटांचा ट्रेंड वाढला आहे. असंच काहीसं इंग्रजी टायटल असलेल्या आगामी चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या कलाकारांची 'मीडियम स्पाइसी' रेसिपी पाहायला मिळणार आहे.


हलकाफुलका विषय 

यापूर्वी 'सांगतो ऐका', 'वजनदार', 'रिंगण', 'गच्ची', 'रेडू', 'नशीबवान', 'पिप्सी' अशा विविधांगी चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणाऱ्या विधी कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'मीडियम स्पाइसी' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळंच रसायन पाहायला मिळणार आहे. नाट्य दिग्दर्शक आणि उत्तम संकलक म्हणून ख्याती असलेले मोहित टाकळकर या चित्रपटाद्वारे प्रथमच चित्रपट दिग्दर्शन करीत आहेत. मराठी भाषिक असून हिंदी, उर्दू आणि कन्नड भाषिक नाटकांचा अनुभव असलेल्या टाकळकर यांनी चित्रपटाकडं वळताना एक हलकाफुलका विषय निवडला आहे.


नात्यांची लज्जतदार गुंफण

या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांची लज्जतदार गुंफण पहायला मिळेल. अलिकडच्या काळात 'लव्ह सोनिया', 'डेट विथ सई' या वेबसिरीजमुळं चर्चेत असलेली सई ताम्हणकर, 'आनंदी गोपाळ' या चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तिरेखा रंगवणारा ललित प्रभाकर आणि बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी पर्ण पेठे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी कधीही एकत्र न दिसलेले हे तीन कलाकार टाकळकर यांनी एकाच चित्रपटात एकत्र आणले आहेत. त्यामुळं या तिघांची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. 


शुटिंग लवकरच सुरु 

दिग्दर्शनासोबतच संकलनात हातखंडा असणाऱ्या टाकळकर यांनी कलाकारांची एक चांगली टिम निवडून सुरुवातीलाच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अद्याप रिव्हील करण्यात आलेली नाहीत. नात्यांसह विविध बाबींमध्ये आपण नेहमीच मध्यममार्ग म्हणजेच 'मीडियम'ला बऱ्याचदा प्राधान्य देत असतो. अशाच आवडी– निवडी आणि सवयींबद्दल खुसखुशीत भाष्य करणाऱ्या 'मीडियम स्पाइसी' या चित्रपटाचं शुटिंग लवकरच सुरु होणार आहे.हेही वाचा- 

अमिताभ मराठी चित्रपटात

चुपके-चुपकेच्या रिमेकमध्ये धर्मेद्रची भूमिका साकारणार 'हा' कलाकार
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा