Advertisement

अमिताभ मराठी चित्रपटात

अमिताभ यांचे पर्सनल मेकअपमन असलेल्या दीपक सावंत यांनी बनवलेल्या 'अक्का' या मराठी चित्रपटातील एका गाण्यात अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासह परफॅार्म केलं होतं. आता प्रथमच मराठी चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

अमिताभ मराठी चित्रपटात
SHARES

यापूर्वी मराठी चित्रपटातील एका गाण्यात दिसलेले अमिताभ बच्चन आता 'एबी आणि सीडी' या हलक्या फुलक्या कौटुंबिक मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.


मराठीत पुनरागमन

आज मराठीचा डंका इतका वाजतोय की, भल्याभल्यांना मराठी चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा मोह आवरता येत नाही. अमिताभ बच्चनसारख्या एका बड्या कलाकारानं तर फार पूर्वीच मराठीचा स्वाद चाखला आहे. अमिताभ यांचे पर्सनल मेकअपमन असलेल्या दीपक सावंत यांनी बनवलेल्या 'अक्का' या मराठी चित्रपटातील एका गाण्यात अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासह परफॅार्म केलं होतं. आता प्रथमच मराठी चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या 'एबी आणि सीडी' असं काहीसं अनोखं शीर्षक असलेल्या चित्रपटाद्वारे अमिताभ मराठीत पुनरागमन करत आहेत.


मित्राची भूमिका

२० मे पासून मुंबईत 'एबी आणि सीडी'च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. एका भल्या मोठ्या हॅालमध्ये चार ते पाच दिवस या चित्रपटाचं शूटिंग सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चित्रीकरणाच्या या शेड्युलमध्ये अमिताभ सहभागी झाले असून, या चित्रपटात विक्रम गोखलेही आहेत. या चित्रपटात ते अमिताभ यांच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहेत. यापूर्वी 'खुदा गवाह' या हिंदी चित्रपटात अमिताभ आणि विक्रम यांच्या मैत्रीचा जलवा प्रेक्षकांनी पाहिला आहे. त्या चित्रपटात बादशाह खान  बनलेल्या अमिताभ यांनी विक्रम यांनी साकारलेल्या आपल्या राजपूत मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी फार मोठा त्याग केल्याचं पाहायला मिळालं होतं.


 दोन मित्रांची गोष्ट 

अमिताभ यांनी जरी फार पूर्वी 'अक्का' चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली असली तरी त्यानंतरही त्यांनी मराठीशी आपलं नातं जपलं आहे. अमिताभ यांच्या होम प्रोडक्शनमध्ये बनलेल्या 'विहीर' चित्रपटानं देश-विदेशातील चित्रपट महोत्सव गाजवत बरेच पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. 'एबी आणि सीडी' या चित्रपटाद्वारे ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणं ही त्यांच्या मराठी चाहत्यांसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. या चित्रपटाची पटकथा-संवाद लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. या चित्रपटात दोन मित्रांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. विक्रम साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नाव चंद्रकांत देशपांडे म्हणजेच सीडी आहे. 


मुंबईसह पुण्यात शूटिंग

निवृत्त शिक्षक असलेल्या सीडी यांना जीवनाच्या एका वळणावर समजतं की, अमिताभ बच्चन आपले वर्गमित्र आहेत. त्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो. त्यांच्या जीवनात झालेल्या कायापालटावर आधारित अशी 'एबी आणि सीडी'ची कथा असल्याचं समजतं. अमिताभ यांना जेव्हा या चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली, तेव्हा एदलाबादकर आणि लेले यांच्यासोबत विक्रमही होते. अमिताभ यांनी लक्ष देऊन चित्रपटाची कथा ऐकली. अमिताभ यांना कथा आवडली आणि त्यांनी होकार दिल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात दोन गाणी असून, मुंबईसह पुण्यात 'एबी आणि सीडी'चं शूटिंग करण्यात येणार आहे. अद्याप इतर कलाकारांची निवड बाकी आहे.हेही वाचा -

‘मिस यू मिस्टर’ म्हणत एकत्र आले सिद्धार्थ-मृण्मयी

अभिनयासाठी अमोलनं घटवलं सात किलो वजन!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा