Advertisement

अभिनयासाठी अमोलनं घटवलं सात किलो वजन!

मला जेव्हा 'बाबो' चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा चित्रीकरणासाठी केवळ एकच महिना उरला होता. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी माझ्याजवळ महिन्याभराचाच वेळ होता. प्रत्यक्षात दिसणारं व्यक्तिमत्व पडद्यावरही तितकंच आकर्षक दिसावं याकरिता मी प्रॉपर डाएट आणि वर्कआउट फॉलो केला.

अभिनयासाठी अमोलनं घटवलं सात किलो वजन!
SHARES

काही कलाकार आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असतात, पण जेव्हा एखादा निर्माता मुख्य भूमिका साकारण्यासाठी वजन घटवतो, तेव्हा त्याचं कौतुकच होतं. अमोल कागणे या तरुण निर्मात्यानं मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी वजन घटवलं आहे.


३१ मे ला बाबो प्रदर्शित

अमोलनं आजवर काही चित्रपट आणि नाटकांमध्ये लहानसहान भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे, पण चित्रपट निर्मितीसोबतच अभिनयाकडंही पॅशन म्हणून पाहणारा अमोल आता मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बाबो’ या आगामी मराठी चित्रपटात अमोलनं नायकाची भूमिका साकारली आहे. ३१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मल्टीस्टारर विनोदी चित्रपटासाठी अमोलनं विशेष मेहनत घेत केवळ एका महिन्याभरात सात किलो वजन घटवलं आहे.   


महिन्याभराचाच वेळ 

काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या 'बाबो' मधील 'म्याड रं…' या गाण्यासोबतच टिझरमध्येही अमोलची झलक पहायला मिळत आहे. ‘बाबो’साठी वजन घटवण्याबाबत अमोल म्हणाला की, मला जेव्हा 'बाबो' चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा चित्रीकरणासाठी केवळ एकच महिना उरला होता. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी माझ्याजवळ महिन्याभराचाच वेळ होता. प्रत्यक्षात दिसणारं व्यक्तिमत्व पडद्यावरही तितकंच आकर्षक दिसावं याकरिता मी प्रॉपर डाएट आणि वर्कआउट फॉलो केला. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मिळाल्याचं अमोल म्हणाला.



हेही वाचा -

'बंदिशाळा'मध्ये पहा डॅशिंग मुक्ता




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा