Advertisement

'बंदिशाळा'मध्ये पहा डॅशिंग मुक्ता

खाकी परिधान केलेली मुक्ता आणि त्यामागं आपसात भांडणाऱ्या कैद्यांचं दृश्य पाहिल्यावर हा चित्रपट एखाद्या तुरुंगाची कथा सांगणारा असल्याची जाणीव होते. चित्रपटाच्या पोस्टरवर 'बंदिशाळा'नं गाजवलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कारांचीही नोंद करण्यात आली आहे.

'बंदिशाळा'मध्ये पहा डॅशिंग मुक्ता
SHARES

कायम वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्री मुक्ता बर्वेनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता हिच मुक्ता एका डॅशिंग भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मोशन पोस्टर रिलीज

मुक्ताच्या 'बंदिशाळा' या चित्रपटाची मागील बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. अशातच या चित्रपटातील मुक्ताचा डॅशिंग लुक दाखवणारं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये पोलिसी खाकी परिधान केलेल्या मुक्तानं एका गुंडाला आपल्या दणकट हातांनी जखडून ठेवल्याचं पाहायला मिळतं.


तुरुंगाची कथा 

खाकी परिधान केलेली मुक्ता आणि त्यामागं आपसात भांडणाऱ्या कैद्यांचं दृश्य पाहिल्यावर हा चित्रपट एखाद्या तुरुंगाची कथा सांगणारा असल्याची जाणीव होते. चित्रपटाच्या पोस्टरवर 'बंदिशाळा'नं गाजवलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कारांचीही नोंद करण्यात आली आहे. फेस्टिव्हल दे कान्स आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या चित्रपटानं मिळवलेल्या भरघोस यशाचा उल्लेखही पोस्टरवर आहे. सत्यकथेवरून प्रेरीत असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केलं आहे. कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन संजय कृष्णाजी पाटील यांचं आहे. 


२१ जून रोजी प्रदर्शित

२१ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती स्वाती पाटील यांनी केली आहे. सुरेश देशमाने यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, संगीत अमितराजनं दिलं आहे. या चित्रपटात विक्रम गायकवाड, आशा शेलार, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, अभिजीत झुंझारराव, सविता प्रभुणे, अजय पूरकर, उमेश जगताप, प्रवीण तरडे, आनंद अलकुंटे, आनंदा कारेकर, माधव अभ्यंकर, अश्विनी गिरी, अनिल नगरकर, शिवराज वावळेकर, प्रसन्ना केतकर, वर्षा घाटपांडे, पंकज चेंबूरकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.हेही वाचा -

चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला मराठी चित्रपट 'हाफ तिकीट'

मृणालचा 'वेलकम' लुक!
संबंधित विषय
Advertisement