मृणालचा 'वेलकम' लुक!

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वेलकम होम' या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.

  • मृणालचा 'वेलकम' लुक!
  • मृणालचा 'वेलकम' लुक!
SHARE

अभिनयासोबत दिग्दर्शनातही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणाऱ्या मृणाल कुलकर्णी कधी ऐतिहासिक, तर कधी मॅाडर्न लुकमध्ये प्रेक्षकांना भेटल्या आहेत. आता मृणालचा 'वेलकम' लुकही समोर आला आहे.


पहिलं पोस्टर लॉंच

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वेलकम होम' या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटातील मृणालचा सुंदर लुक मन मोहणारा आहे. भावे-सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींनी कायम प्रवाहापेक्षा वेगळे आणि अनोखी मांडणी असलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळंच 'वेलकम होम' हा चित्रपट खूप महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे. याच जोडीला या चित्रपटात मृणालसारखी सर्जनशील अभिनेत्री असल्यानं उत्सुकता अधिकच वाढली आहे.


स्त्रीचं भावविश्व आणि विचारांची कथा

या चित्रपटात एका स्त्रीचं भावविश्व आणि तिच्या विचारांची कथा पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा चित्रपट घर या संकल्पनेवर आधारित आहे. त्यातही स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध घेण्यात आला आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय सुंदर आणि लक्षवेधी आहे. त्यामुळं सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी 'वेलकम होम' या चित्रपटात नेमकं काय आणि कशाप्रकारे मांडलं आहे ते पाहायचं आहे.


लेखक सुमित्रा भावे 

या चित्रपटात मृणालसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी स्टारकास्ट आहे. लेखन सुमित्रा भावे यांचं आहे. सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन केलं असून, पार्थ उमराणी यांनी संगीत दिलं आहे. मोहित टाकळकर यांनी संकलन तर, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन केलं आहे.हेही वाचा -

बाईकनं रोड ट्रिपला जायचंय? बॉर्न टू राईड आहे ना

मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी व शनिवारी पावसाची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या