Advertisement

बाईकनं रोड ट्रिपला जायचंय? बॉर्न टू राईड आहे ना

बॉर्न टू राईड बाईकप्रेमींसाठी त्यांच्या आवडीच्या बाइक्स घेऊन आली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या बुलेटपासून ते डुक आणि ट्रिप बॉनवील (Triumph Bonneville) सुद्धा भाड्यानं घेऊ शकता. जी बाईक घेणं अनेकांचं स्वप्न असतं.

बाईकनं रोड ट्रिपला जायचंय? बॉर्न टू राईड आहे ना
SHARES

रोजच्या धावपळीत, कामाच्या व्यापात एखादा ब्रेक घ्यावा आणि लाँग ड्राइव्हवर जावं असं प्रत्येकाला वाटतं. जिथे एकांत आणि शांतता असावी आणि मनात येईल तिथे फिरता यावं. अनोळखी रस्त्यांवर जाऊन नवनवीन ठिकाणं बघावी आणि रोजचा सगळा स्ट्रेस विसरून जावा.

तसं प्लॅनिंगही होतं. कधी नव्हे ते मित्र-मैत्रिणी पण तयार असतात. पण गरज असते ती एका जबरदस्त बाईकची. कारण बाईकवरून ट्रिपला जाण्याची मजाच काही और असते. पण बाईक आणायची कुठून असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण नॉट टू वरी. तुमच्यासाऱ्या बाईक प्रेमींसाठी मुंबईतील 'बॉर्न टू राईड' नावाची फर्म एक हटके आयडिया घेऊन आली आहे.


बाईक मिळणार भाड्यानं

बॉर्न टू राईड बाईकप्रेमींसाठी त्यांच्या आवडीच्या बाइक्स घेऊन आली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या बुलेटपासून ते डुक आणि ट्रिप बॉनवील (Triumph Bonneville)  सुद्धा भाड्यानं घेऊ शकता. जी बाईक घेणं अनेकांचं स्वप्न असतं. शोरूममध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या बाईकला हात लावावा की नाही असा विचार करता किंवा जी बाईक विकत घेण्यासाठी तुम्ही दर महिन्याला बचत करता. पण आता ती बाईक जर भाड्यानं का होईना तुम्हाला चालवायला मिळत असेल तर तुमच्यासाठी यापेक्षा आनंददायी गोष्ट दुसरी कोणतीही नसेल नाही का?


परवडेल असं भाडं

बाइक्सचे भाडे अगदी सामान्य व्यक्तीला परवडतील असेच आहे. बाईकसोबतच तुम्ही हेल्मेट आणि जॅकेटसुद्धा भाड्यानं घेऊ शकता. १५०० रुपयापासून ते ४००० रुपयांपर्यंत इथल्या बाईक्सच भाडं आहे. भाडं प्रत्येक बाईकच्या ब्रँडवर अवलंबून आहे. पण तुम्हाला पडवडेल असंच आहे.     


कशी बुक कराल?    

घरबसल्या तुम्ही तुमची बाईक बुक करू शकता. फक्त कंपनीच्या contact@borntoride.co.in यावर मेल करावा लागेल. याशिवाय तुम्ही त्यांच्या शोरुममध्ये देखील भेट देऊ शकता.

कुठे : शॉप नंबर ३, गंगा जमुना अपार्टमेंट, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प.)
संबंधित विषय
Advertisement