Advertisement

अनिकेतने प्रेक्षकांनाच घातला गंडा!


अनिकेतने प्रेक्षकांनाच घातला गंडा!
SHARES

दोन दिवसांपूर्वी अभिनेता अनिकेत विश्वासराव याने फेसबुक लाईव्हद्वारे प्रेक्षकांना आपल्याला एका टोळीने लाखोंचा गंडा घातला याबाबत खुलासा केला. अनिकेतच्या या फेसबुक लाईव्हमुळे सगळेच बुचकळ्यात पडले. एका अभिनेत्याची सहज फसवणूक होऊ शकते, तर सर्वसामान्यांना ही टोळी सहज गंडा घालेल, अशी चर्चाही त्यादिवशी नाक्या-नाक्यावर, ट्रेनमध्ये रंगल्या होत्या.

पण अनिकेतला कुणी नाही, तर अनिकेतनेच प्रेक्षकांना गंडवलं होतं. खुद्द अनिकेतनेच पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह करत ही गोष्ट प्रेक्षकांसमोर आणली आहे. 'मला कोणीही गंडा घातलेला नाही' असं सांगतानाच लवकरच येणाऱ्या 'मस्का' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसं केल्याचं अनिकेतने यावेळी सांगितलं.

मराठीमध्ये  चित्रपटाच्या हटके प्रमोशनचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन करत आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. या आधी 'मुरांबा' या चित्रपटाच्या टीमने अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांचा फोटो व्हॅलेंटाईनच्या दिवशी सोशल मीडियावर टाकला होता. यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. अशा हटके प्रमोशनमुळे याचा चित्रपटाला फायदा होत असतो. यामुळे चित्रपट सतत चर्चेत राहतो.


'मस्का' हा चित्रपट फ्रॉड या विषयावर आधारीत आहे. हे अऩिकेतच्या फेसबुक लाईव्हवरून लक्षात येते. तीन लोकांची टोळी अनिकेतला चित्रपटामध्ये  कसा गंडा घालते, हे तुम्हाला १ जून ला बघायला मिळणार आहे. ही गंडा घालणारी टोळी आहे प्रार्थना बेहरे, प्रणव रावराणे आणि शशांक शेंडे यांची. हे तिघे मिळून अनिकेत विश्वासराव आणि चिन्मय मांडलेकरला गंडा घालतात. हा एक विनोदी चित्रपट आहे.





हेही वाचा

ठरलं...मराठी बिग बॉसच्या घरात पहिला प्रवेश उषा नाडकर्णींचा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा