Advertisement

दादा कोंडके स्मृती पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न


दादा कोंडके स्मृती पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न
SHARES

रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या दादा कोंडके यांच्या अभिनयाला मराठी चित्रपट सृष्टी कायम स्मरणात ठेवेल. दादांनी गाजवलेल्या सिनेमांची मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांची नोंद झाली. विनोदासोबतच रसिकांच्या भावनेला हात घालून पोट धरून हसवता हसवता त्यांच्या डोळ्यांत टचकन पाणी आणण्याचं कसब दादांच्या अभिनयात होतं.



दादांची २०वी पुण्यतिथी

दादांच्या याच अमूल्य ठेव्याची रसद मराठी रसिकांसोबत आणि कलाकारांसोबतही कायम रहावी, म्हणून त्यांच्या नावाने दरवर्षी दादा कोंडके स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी या सोहळ्याला रसिकांसोबतच दिग्गज कलाकार मंडळींचीही उपस्थिती असते. यावर्षीही नुकताच दादा कोंडकेंच्या २०व्या पुण्यतिथीनिमित्ताने दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला असंच काहीसं चित्र होतं.



५ कलाकारांना पुरस्कार प्रदान

दादांच्या नावाने ५ वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना प्रमुख अतिथि आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार या वेळी देण्यात आला. यात अभिनेता अंकुश चौधरी, चित्रपट निर्मात्या समृद्धी पोरे, शाहीर कृष्णकांत जाधव, गीतकार अशोक बागवे आणि दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांचा समावेश आहे.



अरविंद सावंत प्रमुख पाहुणे

दादा कोंडके यांचे भाचे पद्माकर मोरे, कामाक्षी फिल्म डिस्ट्रिब्युटर आणि मुक्ता कम्युनिकेशन्सचे संतोष परब यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. जीवनाधार फाऊंडेशन आणि डॉ. शांताराम कारंडे फॅन फाऊंडेशन यांचे सोहळ्याला सहकार्य लाभले.




हेही वाचा

'दादा'गिरीला सलाम !


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा