Advertisement

२४ मार्चला प्रदान होणार दादा कोंडके स्मृती पुरस्कार

दादा कोंडके यांच्या नावाने त्यांचे भाचे पद्माकर मोरे आणि भाचीसून माणिकताई मोरे हे गेली ९ वर्ष या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहेत. यंदा कामाक्षी फिल्म्स डिस्ट्रीब्यूटर यांच्या सहकार्याने आणि मुक्ता इव्हेन्ट्स अॅण्ड हॉस्पिटॅलिटी यांच्या आयोजनातून या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

२४ मार्चला प्रदान होणार दादा कोंडके स्मृती पुरस्कार
SHARES

चतुरस्त्र कलाकार, कॉमेडीचा बादशहा दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी दादा कोंडके स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा २४ मार्च २०१८ ला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दादारमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.


दादा कोंडके यांच्या नावाने त्यांचे भाचे पद्माकर मोरे आणि भाचीसून माणिकताई मोरे हे गेली ९ वर्ष या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहेत. यंदा कामाक्षी फिल्म्स डिस्ट्रीब्यूटर यांच्या सहकार्याने आणि मुक्ता इव्हेन्ट्स अॅण्ड हॉस्पिटॅलिटी यांच्या आयोजनातून या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


पाच विभागांत देणार पुरस्कार

शाहिरी, अभिनय, दिग्दर्शन, गीतकार आणि निर्माता या पाच विभागांत शाहीर दादा कोंडके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अभिनय विभागात अंकुश चौधरी, दिग्दर्शन विभागात पुरूषोत्तम बेर्डे, शाहीर कृष्णकांत जाधव यांना शाहीर विभागात, तर समृद्धी पोरे यांना निर्मिती विभागात आणि कवि- गीतकार या विभागात अशोक बागवे यांना हा पुरस्कार देण्यात येईल.



दादा कोंडके यांच्या चित्रपटांविषयी

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या 'तांबडी माती' या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर दादांनी मागे वळून बघितलेच नाही. 'तांबडी माती' पाठोपाठ आलेल्या 'सोंगाड्या'(१९७१)ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरलेल्या या चित्रपटा नंतर दादांचे एकामागोमाग एक हिट चित्रपट आले. 

स्वत:च्या 'कामाक्षी प्रॉडक्शन' कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केला. १९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तिथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९० - पळवा पळवी, १९९२ - येऊ का घरात आणि १९९४ - सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शनने प्रदर्शित केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा