Advertisement

'दादा'गिरीला सलाम !


SHARES

परेल - गेल्या अनेक वर्षात आपल्या कलेचा जादुई ठसा रसिकांच्या मनावर उमटवून अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू कलाकार म्हणजेच दादा कोंडके. दादा कोंडके यांच्या नावाने दिला जाणारा दादा कोंडके स्मृती पुरस्कार सोहळा रविवारी परेलच्या दामोदर नाट्यगृहात पार पडला. 

दादांच्या नावाने 5 वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना हा पुरस्कार या वेळी देण्यात आला. यात अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे तसंच अभिनेता भरत जाधव, गीतकार प्रवीण दवणे, शाहीर मधू खामकर आणि निर्माती उज्वला गावडे यांना दादा कोंडके स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

आतापर्यंत कलाक्षेत्रातल्या एका नामवंताला दादा कोंडके स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येत होतं. दादा कोंडके यांचे भाचे पद्माकर मोरे आणि मुक्ता कम्युनिकेशन्सचे संतोष परब यांच्या पुढाकाराने या वर्षीपासून दिवंगत दादा कोंडके यांची दादागिरी चाललेल्या लेखन, अभिनय, दिग्दर्शन, शाहिरी आणि निर्मितीत अमूल्य योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांना दादा कोंडके स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

दादांसारख्या अष्टपैलू कलाकाराच्या नावाने पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकार भारावून गेल्याचं चित्र या वेळी पहायला मिळालं. तसंच या निमित्ताने 'सोंगाड्या' या दादा कोंडके यांच्या बहारदार गीत-नृत्याने आणि किस्से-प्रहसनांनी नटलेल्या नाटकाचा 50 वा प्रयोग सादर करण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा