Advertisement

अभिनेते प्रशांत दामले कोरोना पॉझिटिव्ह

याचमुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.

अभिनेते प्रशांत दामले कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले कोरोनाची लागण झाली आहे. याचमुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. यासोबत ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

फेसबुकवर प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर करून यासंबंधीची सविस्तर माहिती दिली. बुधवारपासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहे. प्रशांत दामले यांच्यासोबत काम करणारे सह-कलाकार निरोगी असल्याचंही दामले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं.


लॉकडाउननंतर पहिल्यांदाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांचं आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.

जवळपास आठ महिन्यांनी नाट्यगृह सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांनी स्वतः नाट्यगृहांमध्ये जाऊन काही काळ तिकीट विक्री केली होती. इतकंच नाही तर अभिनेते प्रशांत दामले आणि किशोरी लाड यांनी स्वतः प्रेक्षकांचे स्वागत करत पहिल्या पाच रसिकांना तिकीटं दिली होती.


हेही वाचा

२०२० मध्ये 'या' सेलिब्रिटिंनी दिली गुड न्यूज

उर्मिला मातोंडकर यांच इन्टाग्राम अकाऊन्ट हॅक

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा