शशांकसोबत ही नवी मुलगी कोण?


SHARE

आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मग त्यात कलाकारही आलेच. सोशल मीडियावर सिनेअभिनेते आणि अभिनेत्री आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दलचे अपडेट आपल्या चाहत्यांना देत असतात. होणार सून मी ह्या घरचीमधून सर्वांच्या घराघरात पोहोचलेला शशांक केतकर आजकाल जास्तच चर्चेत दिसत आहे, ते त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. त्याच्या सोशल नेटवर्किंग साईटवर हल्लीच एक फोटो शेअर करण्यात आलाय. ज्यात तो एका मुलीसोबत रँडम पोज देताना दिसत आहे!हा फोटो सध्या खूप  चर्चेचा विषय बनला आहे. अखेर हि मुलगी आहे कोण? हा प्रश्न सध्या शशांकच्या फॅन्सना पडलाय. शशांकसोबत झळकणारा हा सुंदर चेहरा आहे अभिनेत्री रीना अग्रवाल हिचा.

सोशल मीडिया हा अभिनेता आणि फॅन्स मधील दुआ आहे आणि हीच गोष्ट अतिशय चांगल्या रीतीने समजलेल्या शशांकने आपल्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर रीना सोबतचा एक फोटो पोस्ट करून आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपल्यासोबत असणारी नवी अभिनेत्री अशी ओळखकरून दिली आहे. आता कुतुहल याचं आहे, की हा नवा प्रोजेक्ट नक्की असणार काय? सध्या तरी या नव्या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.


संबंधित विषय