Advertisement

अमृता खानविलकरची आता बॉलिवूडमध्ये चालणार जादू!


अमृता खानविलकरची आता बॉलिवूडमध्ये चालणार जादू!
SHARES

मराठी प्रेक्षकांना आपल्या नृत्याने आणि अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आता बॉलिवूडमध्ये आपली जादू चालवत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर अमृताने हिंदी चित्रपटात काम करायला सुरुवात केली आहे. आगामी काळात प्रेक्षकांना तिचे अनेक हिंदी चित्रपट बघायला मिळणार आहेत.

अभिनेता जॉन अब्राहम सोबत डार्क अॅक्शन थ्रिलर सिनेमात अमृता झळकणार आहे. नुकतंच अमृताने तिच्या 'राजी' या चित्रपटाचं शुटींगही पूर्ण केलं आहे. 'राजी'नंतर ती अनेक हिंदी चित्रपटात झळकणार आहे.


सोशल मीडियावर शेअर केला फोटो

लवकरच अमृता अभिनेता मनोज वाजपेयीसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. नुकताच तिने मनोज वाजपेयी याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिग्दर्शक निखील अडवाणी या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तसेच, 'एक व्हिलन' या चित्रपटाचा लेखक मिलाप झवेरी हा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. अमृता सोबत या चित्रपटात मनोज वाजपेयी तसेच जॉन अब्राहमही आहे. अमृताच्या या नव्या चित्रपटामुळे तिच्या इतकेच तिचे चाहतेही खुश आहेत.


अमृताला लागली लॉटरी

२०१८ मध्ये अमृताला हिंदी सिनेमाची जणू लॉटरीच लागली आहे. तिचे एकामागोमाग एक हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. आमृता सध्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये चांगलीच व्यस्त आहे. पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांशी संवादही साधत असते. आपल्या नवनवीन पोस्टद्वारे ती चित्रपटाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्या चाहत्यांना देते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा