Advertisement

'आम्ही दोघी'साठी कायपन!


'आम्ही दोघी'साठी कायपन!
SHARES

चित्रपटातील भूमिका उठावदार आणि पात्र खरी वाटावीत यासाठी आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री खूपच मेहनत घेताना दिसत आहेत. वजनदार या चित्रपटाच्या वेळी प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोघींनी तर चक्क आपलं वजन वाढवलं होतं. असाच काहीसा अनुभव मुक्ता बर्वेनं देखील घेतलाय. निमित्त होतं ‘आम्ही दोघी’ या चित्रपटाचं. या चित्रपटासाठी मुक्ता चक्क विणकाम शिकली आहे.



‘आम्ही दोघी’ चित्रपटाची कथा दोन स्त्रियांचा स्वभाव आणि त्यांच्या नात्यावर आधारीत आहे. यातील अमला नावाची व्यक्तिरेखा मुक्ता बर्वे साकारत आहे. या व्यक्तीरेखेसाठी विणकाम शिकणं गरजेचं होतं. त्यामुळे केवळ विणकाम करण्याचा अभिनय न करता ते शिकण्याचा निर्णय मुक्तानं घेतला आणि खूप कमी कालावधीत मुक्ता विणकाम शिकली देखील!


काय आहे चित्रपटाची कथा?

नावाप्रमानेच ही दोघींची कथा आहे. त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच आहे. त्या दोघींचे विचार वेगळे आहेत. पण त्यांची आवड एकच आहे. अशी अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची ही कथा आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट निर्मित हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शन प्रतिमा जोशी यांनी केलं आहे.

'आम्ही दोघी’ ही आजच्या तरुणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, पिता-मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घ्यायला हवा, ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते.

प्रतिमा जोशी, दिग्दर्शिका



हेही वाचा

गुलाबजाम खायचाय? मग हे पोस्टर पाहा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा