Advertisement

प्रार्थनाचा हटके हनीमून मूड....

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर सध्या हनीमून एन्जॉय करतायत. प्रार्थना बाली, सिडनी, लंडनमध्ये हनीमून एन्जॉय करतेय. तिच्या पतीसोबत तिने अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे दोघे १ महिन्याच्या हनीमूनवर गेले आहेत.

प्रार्थनाचा हटके हनीमून मूड....
SHARES

१४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकेलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर सध्या हनीमून एन्जॉय करतायत. प्रार्थना बाली, सिडनी, लंडनमध्ये हनीमून एन्जॉय करतेय. तिच्या पतीसोबत तिने अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे दोघे १ महिन्याच्या हनीमूनवर गेले आहेत. या दोघांनी शेअर केलेल्या फोटोवरून ते हनीमून मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत.

अभिषेक जावकर हा दिग्दर्शक आणि लेखक आहे. प्रार्थना आणि अभिषेकचे हे अरेंज मॅरेज आहे. एका मॅरेज ब्युरोमधून या दोघांचे लग्न जुळले. प्रार्थनाने तिच्या हळदीपासून ते लग्नापर्यंतचा प्रत्येक क्षण सोशल मीडियामार्फत चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छाही दिल्या. तिने आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत.







प्रार्थनाचे डेस्टिनेशन वेडिंग

प्रार्थनाने गोव्यामध्ये १४ नोव्हेंबरला अभिषेक जावकरशी लग्ल केले. या लग्नाला अनेक मराठी सेलेब्रिटिंनी हजेरी लावली होती. लग्नानंतर प्रार्थनाने एका कॉकटेल पार्टीचे आयोजनही केले होते!



 लग्नावेळी प्रार्थना आणि अभिषेकने केलेल्या वेडिंग टॅटूचीही स्तुती चाहत्यांनी केली.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा