प्रार्थना बेहेरे अडकली लग्नगाठीत!


SHARE

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नगाठीत अडकली आहे. नुकताच प्रार्थना आणि अभिषेक जावकर यांचा लग्नसोहळा गोव्यात पार पडला. अभिषेक जावकर हा दिग्दर्शक आणि लेखक आहे. प्रार्थना आणि अभिषेक यांचे हे अरेंज मॅरेज आहे. एका मॅरेज ब्युरोमधून या दोघांचे लग्न जुळले. काही महिन्यांआधीच या दोघांचे फोटो सोशल मीडियावर एकत्र पाहण्यात आले होते, तेव्हाच या दोघांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या होत्या.

प्रार्थनाने तिच्या हळदीचे आणि लग्नाचे काही फोटो तिच्या सोशल प्रोफाइलवर शेअरही केले होते. त्याचबरोबर कलाकारांनीही सोशल मीडियावर प्रार्थना आणि अभिषेकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्ही जर ते फोटो पहिले नसतील तर प्रार्थनाच्या लग्नाचे हे काही खास फोटो तुमच्यासाठी...

हेही वाचा

शिका सोप्या आणि नवीन रेसिपीज ‘ट्रेंडी टेस्टी ट्रीट’वर!


संबंधित विषय