Advertisement

शिका सोप्या आणि नवीन रेसिपीज ‘ट्रेंडी टेस्टी ट्रीट’वर!


शिका सोप्या आणि नवीन रेसिपीज ‘ट्रेंडी टेस्टी ट्रीट’वर!
SHARES

खमंग, चमचमीत, लज्जतदार, झणझणीत हे शब्द कानावर जरी पडले तरी तोंडाला पाणी सुटते! चांगले आणि नवीन पदार्थ खायला कोणाला आवडत नाहीत? पण तेच पदार्थ करायचे म्हटलं, तर ते सगळ्यांनाच जमतात असंही नाही.

घरातल्या महिलांसाठी तर 'उद्या डब्यात काय देऊ?' हा प्रश्न रोजचाच आहे. उरलेल्या अन्नाचं काय करायचं? हाही तसाच रोज पडणारा प्रश्न. असेच काही प्रश्न सोडवण्यासाठी व उत्तम प्रकारे सोप्या आणि कमी वेळेत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकवण्यासाठी व ते उत्तम प्रकारे कसे बनवायचे? यासाठी मराठीतील अभिनेत्री भार्गवी चिरमुले तिची पहिली वेबसीरीज 'ट्रेंडी टेस्टी ट्रीट' या नावाने घेऊन येत आहे!



'ट्रेंडी टेस्टी ट्रीट’चा पहिला प्रोमो नुकताच यूट्यूबवर 'ट्रेंडी टेस्टी ट्रीट' या चॅनेलवर लाँच करण्यात आला आणि त्याचा पहिला एपिसोड १० नोव्हेंबर ला प्रसारितही करण्यात आला आहे. या भागात भार्गवीने प्रोमोमध्ये विचारलेला पहिला प्रश्न ‘कॅन मेन कूक?’चं उत्तर शेफ सचिन जोशी यांच्यासोबत शोधलं. पहिल्या एपिसोडमध्ये शेफ सचिन जोशी यांनी ‘टोमॅटो ब्रूसचेता’ असा सोप्पा व सुंदर पदार्थ बनवला. सचिन जोशी गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सक्रिय आहेत व कार्निवल क्रूसलॅन्डस या अमेरिकेतल्या नामांकित कंपनीसाठी त्यांनी काम केलंय. सध्या ते पुण्यात मल्टि-कुसीन रेस्टॉरंट चालवत आहेत. त्याचप्रमाणे ते हॉटेल मॅनेजमेंट फॅकल्टीसुद्धा आहेत.



शेफ सोबत भार्गवी कूकिंग या विषयावर अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमादरम्यान शोधणार आहे. भार्गवी म्हणते 'सध्याच्या या करियर ओरिएंटेड जगात स्त्रिया देखील जेवण बनवण्यापासून दोन हात लांब राहतात. कूकिंग हा प्रत्येक माणसासाठी महत्वाचा विषय आहे आणि मी स्वतः त्यात खूप वाईट आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात. परंतु, ते कसे बनवले जातात? हे माहिती नसतं. तसेच खाद्यात देखील फ्युजन हा प्रकार आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणणार आहोत व अगदी अवघड पदार्थ सोप्या पद्धतीने करून सांगणार आहोत.'



तुम्हालाही या सोप्या रेसिपीज शिकायच्या असतील तर ' ट्रेंडी टेस्टी ट्रीट' या युट्युब चॅनेल ला नक्की भेट द्या.



हेही वाचा

हिंदीतले खलनायक आता मराठीत दिसणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा