Advertisement

हिंदीतले खलनायक आता मराठीत दिसणार!


हिंदीतले खलनायक आता मराठीत दिसणार!
SHARES

हल्ली बरेच हिंदी कलाकार मराठी सिनेमात काम करताना पाहायला मिळतात. लवकरच या यादीत आता एक नाही तर तब्बल ४ हिंदी कलाकारांची नावे समाविष्ट होणार आहेत. आत्तापर्यंत हिंदी सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारणारे अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका हे सर्व आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'धिंगाणा' या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.



दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर यांनी ‘धिंगाणा’चं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाच्या निमित्ताने अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार प्रथमच मराठीत एकत्र दिसणार आहेत. एकाच वेळी चार नामवंत कलाकारांना ‘धिंगाणा’मध्ये खलनायकी भूमिकेसाठी निवडलं जाणं ही कथेची गरज असल्याचं निर्माता समीर सदानंद पाटील यांचं म्हणणं आहे. या चित्रपटाची कथा वर्तमान काळातील वास्तववादी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. त्यामुळे यातील खलनायकी भूमिका साकारणारे कलाकारही त्याच ताकदीचे असणं गरजेचं होतं. मराठीतही खलनायकी भूमिका साकारणारे तगडे कलाकार असले तरी ‘धिंगाणा’मधील व्यक्तिरेखांसाठी हिंदीतले कलाकार आवश्यक होते, असे ते म्हणाले.


या चारही जणांना जेव्हा ‘धिंगाणा’मध्ये अभिनय करण्याबाबत विचारलं गेलं, तेव्हा त्यांना आपापल्या व्यक्तिरेखा खूप भावल्या आणि त्यांनी तात्काळ होकार दिल्याचं दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर यांचं म्हणणं आहे. हे चौघेही एक चिटफंड कंपनी चालवत असल्याचं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ता हनमघर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला हा सिनेमा ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

शुटिंग दरम्यान अपघात, कलाकाराला करावी लागली प्लास्टिक सर्जरी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा