Advertisement

‘वुमन्स डे’ला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स कॉनक्लेव्हमध्ये सई

भारतातील पहिल्या इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित महिलांवर सईनं आपल्या प्रभावी विचारांनी ठसा उमटवला. ‘पॉवर ऑफ डिजीटल वर्ड ऑफ माउथ’ या विषयावर सईनं कॉनक्लेव्हमध्ये आपले विचार मांडले.

‘वुमन्स डे’ला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स कॉनक्लेव्हमध्ये सई
SHARES

डिजीटल डिटॉक्सवरून नुकत्याच परतलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरला वीस्क्वेअर डिजीटल इन्फ्ल्युएन्सर कॉनक्लेवसाठी विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. भारतातील पहिल्या इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित महिलांवर सईनं आपल्या प्रभावी विचारांनी ठसा उमटवला. ‘पॉवर ऑफ डिजीटल वर्ड ऑफ माउथ’ या विषयावर सईनं कॉनक्लेव्हमध्ये आपले विचार मांडले.


दैवी देणगी

महिला दिन साजरा करण्याविषयीचे विचार मांडताना सई म्हणाली की, पुरूष आणि महिला असा भेदभाव न करता, एकत्र येऊन दोघांच्याही शक्तिस्थानांचा योग्य वापर व्हायला हवा. महिला दिन म्हणजे पुरूषांना कमी लेखण्यासाठी किंवा हिन वागणूक देण्यासाठी नाही. आपण खूप कर्तृत्ववान, कर्तबगारी आणि सुंदर आहात याची आपल्याला आठवण करून देण्यासाठी महिला दिन आहे. तुम्ही दैवी देणगी आहात हे लक्षात ठेवून ध्येयाच्या दिशेने झेप घ्यायची आहे. सृजनाची क्षमता असलेल्या स्त्रीसाठी जगात अशक्य काहीच नाही असं मला वाटतं.


ट्रोलर्सकडं दुर्लक्ष

यासोबतच सईनं महिला दिनाच्या निमित्तानं सोशल मीडियाविषयीसुध्दा आपलं मतं मांडलं. ती म्हणाली की, सोशल मीडियावर पोस्ट टाकतानाही आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा त्यातून दिसणं मला महत्वाचा वाटतं. त्यामुळं मी जशी वैयक्तिक जीवनात आहे, तसाच सोशल मीडियावरही माझा वावर असतो. मी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष देत नाही. आपण ट्रोलर्सना ओळखतही नसतो. त्यामुळं चेहरा नसलेल्या व्यक्तींना किती महत्व द्यायचं हे आपणच ठरवायला हवं.


सोशल मीडिया प्रभावी माध्यम

सोशल मीडियाविषयी उत्सुकता असली, तरीही अजही अनेक महिला या विश्वापासून वंचित आहेत. आजही त्या सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहीत. अशा महिलांना उद्देशून सई म्हणाली की, सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असल्यानं टॅलेंटेंड महिलांना ते आपल्या व्यवसायवृध्दीसाठी वापरता येऊ शकेल. त्यामुळे यापासून दूर न पळता याबद्दल माहिती करून घ्यायला हवी. त्यामुळं सर्व कर्तृत्ववान महिलांना मी या नव्या माध्यमाचा पूरेपूर वापर करण्याचा सल्ला देईन.



हेही वाचा -

सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मनातील 'महिलाराज'

एसी शिवशाहीत दिव्यांगांना ७० टक्के भाडे सवलत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा