Advertisement

एसी शिवशाहीत दिव्यांगांना ७० टक्के भाडे सवलत

शिवशाही (आसनी) बसमध्ये दिव्यांग व्यक्तीस प्रवासी भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार असून, या प्रवाशांसोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवासी भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे.

एसी शिवशाहीत दिव्यांगांना ७० टक्के भाडे सवलत
SHARES

एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही (आसनी) बसमध्ये दिव्यांग आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती. त्यानुसार,  गुरुवार ७ मार्चपासून ही सवलत दिव्यांग प्रवाशांना देण्यात आली आहे. शिवशाही (आसनी) बसमध्ये  दिव्यांग व्यक्तीस प्रवासी भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार असून, या प्रवाशांसोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवासी भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. 


शिवशाहीला चांगला प्रतिसाद

एसटी महामंडळाने सुरु केलेली शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यभरातून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या बसमधून प्रवास करणाऱ्या कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. परंतु, लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे. 


दिव्यांग प्रवाशांची मागणी

दिव्यांगांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन शिवशाहीतून प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना तिकीट भाड्यात सवलत देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर दिव्यांगाना ही भाडे सवलत देण्यात येत आहे.


प्रवासी भाड्यात सवलत

एसटी महामंडळामार्फत दिव्यागांना सध्या परिवर्तन आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. त्याशिवाय त्यांच्या साथीदारास परिवर्तन व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. यामध्ये आता वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या प्रवास भाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत.



हेही वाचा -

मेन इन ब्ल्यू अवतरले आर्मी कॅपमध्ये!

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा