'ब्रेव्हहार्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  मुंबई  -  

  प्रभादेवी - वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारीत सिनेमा 'ब्रेव्हहार्ट - जिद्द जगण्याची' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर मुंबईतल्या कोहिनूर हॉलमध्ये झाला. निखिल फिल्म्स प्रस्तुत 'ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची ' हा सिनेमा सच्चीदानंद कारखानीस यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. निर्माते सच्चीदानंद कारखानीस आणि संतोष मोकाशी यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केलीय. तर बंगाली भाषिक दासबाबू यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि श्रीकांत बोजेवार यांनी चित्रपटाची पटकथा, संवाद लिहले आहेत.

  सिनेमात धनश्री काडगावकर आणि संग्राम समेळ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. तर बापाच्या भूमिकेत अरुण नलावडे पाहायला मिळतील. यांच्यासोबतच सिनेमात अतुल परचुरे, इला भाटे, सुलभ देशपांडे, किशोर प्रधान, अभय कुलकर्णी, अथर्व तळवलकर, प्रदीप भिडे, किशोर प्रधान हे कलाकार दिसणार आहेत. सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा 7 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.