SHARE

'ओम भग भुगे भग्नी भागोदरी ओम फट स्वाहा' हा 'खतरनाक' डॉयलॉग म्हणत प्रेक्षकांचा 'थरथराट' उडवणारा तात्या विंचू म्हणजेच 'झपाटलेला ३' हा सिनेमा पुन्हा एकदा सिने रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा नवीन वर्षांत प्रदर्शित होईल, अशी माहीती दिग्दर्शक महोश कोठारे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली.


रसिक प्रेक्षक उत्सुक

याआधी 'झपाटलेला १' आणि 'झपाटलेला २'ने चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांना 'झपाटलेला ३' या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी महेश कोठारे यांनी ट्वीटरवरून ही माहीती दिली होती. मात्र 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना कोठारे यांनी नवीन वर्षांत 'झपाटलेला ३' प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची अधिकृत माहीती दिली आहे.


पहिला मराठी सिक्वल

'झपाटलेला २' हा मराठीतील पहिला मराठी सिक्वल सिनेमा होता. शिवाय 'झपाटलेला २' हा पहिला थ्रीडी सिनेमा आहे. या सिनेमात महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपूरे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत होते.


'झपाटलेला ३' बाबत गुपीत

'झपाटलेला ३' मध्ये कोण-कोण कलाकार असतील याबाबत महेश कोठारे यांनी गुपप्ता पाळली आहे. लवकरच याबाबत आपण प्रेक्षकांना माहिती देऊ, असे कोठारे म्हणाले. त्यामुळे आता या चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत, या चित्रपटात गाणी कोणती असतील याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आता अणखी वाढली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या