SHARE

प्रत्येकजण कॉलेजविश्वात थोडासा ‘इपितर’ म्हणजेच इरसाल असतोतरूणपणातला हा ‘इपितर’पणाच काहीतरी नवं करायचं स्फुरण देतोअसेच तीन ‘इपितर’ मित्र १३ जुलैला आपल्याला भेटणार आहेतपरश्याबॉब्या आणि आर्थिंग्याची ही कथा आहेया चित्रपटाचं ऑफिशिअल पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

'इपितर' हा शब्द अहमदनगर भागात चांगलाच प्रचलित आहे. त्याच भागातील किरण बेरड यांनी 'इपितर'ची निर्मिती केली असूनलेखनही त्यांचंच आहे. याबाबत किरण बेरड म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविद्यालयं जून-जुलैमध्ये सुरू होतात. त्यामुळे जुलै महिन्यातच खऱ्या अर्थानं काॅलेजमधील मैत्री फुलू लागते.या मैत्रीतल्या इपितरपणाचा आलेख नंतर पुढे चढत जातो. याचमुळेच १३ जुलैला 'इपितर'चित्रपट रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे.”

दत्ता तरडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सहनिर्माते आहेतहा सिनेमा कॉलेजविश्वात इरसालपणा केलेल्या प्रत्येकाचं प्रतिनिधीत्व करणारा असल्याचं त्यांचं म्हणणं आहेत्यामुळेच सिनेमा पाहताना प्रेक्षकांना आपल्या कॉलेज जीवनातला इपितरपणा नक्की आठवेल असं त्यांना वाटतं.

डॉ.सोनाली पाटील रॉय आणि डॉसंदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत 'इपितर'ची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड यांनी केली आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेववृंदा बाळ आणि सुहास दुधाडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.हेही वाचा

'दबंग ३'मध्ये झळकणार महेश मांजरेकरांची कन्या अश्वमी


संबंधित विषय
ताज्या बातम्या