Advertisement

नाना पाटेकर अभिनीत 'नटसम्राट' पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित

'नटसम्राट' हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

नाना पाटेकर अभिनीत 'नटसम्राट' पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित
SHARES

'नटसम्राट' हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात झळकला.

कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉकअंतर्गत पुन्हा सुरू झाली आहेत. पुन्हा एकदा चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत.

१ जानेवारी २०१६ रोजी हा चित्रपट पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या चित्रपटाच्या निमित्तानं तब्बल ३५ वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र आले होते. नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची कथा आहे.

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते नाना पाटेकरांनी यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा