Advertisement

'बबन' पोहोचला सिंगापूरला


'बबन' पोहोचला सिंगापूरला
SHARES
Advertisement

'कस्संं?...बबन म्हणेन तसं' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या, आणि सलग चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल ठरत असलेल्या 'बबन' या सिनेमाने आता थेट सिंगापूर गाठलं आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील या सिनेमाचा आस्वाद घेता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून 'बबन'च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार १५ एप्रिल रोजी सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी 'बबन'ची भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे.


प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. 'बबन' सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे.

वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमाच्या यादीत 'बबन'चा समावेश झाला आहे. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' चा हा गावराण बाणा सिंगापूरमध्येदेखील आपली कमाल दाखवणार हे निश्चित!

संबंधित विषय
Advertisement