Advertisement

सयाजीच्या उपस्थितीत ‘फ्लिकर’च्या चित्रीकरणाला सुरुवात

‘फ्लिकर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अभिनेता सयाजी शिंदेच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे. निर्माते राज सरकार यांनी ‘महेक फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘फ्लिकर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे. या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा सयाजी शिंदेही यावेळी उपस्थित होता.

सयाजीच्या उपस्थितीत ‘फ्लिकर’च्या चित्रीकरणाला सुरुवात
SHARES

विषय आणि आशयाची एकसंध मांडणी केलेली पटकथा आणि त्याला दिलेली मनोरंजक मूल्यांची जोड या कारणांमुळे मराठी चित्रपट इतर प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत उजवा ठरतो. याशिवाय अनोख्या शीर्षकांमुळेही मराठी चित्रपट वेगळं अस्तित्व जपण्यात यशस्वी होतो. असंच एक वेगळं शीर्षक असलेल्या ‘फ्लिकर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अभिनेता सयाजी शिंदेच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे.


सयाजी शिंदेही उपस्थित

निर्माते राज सरकार यांनी ‘महेक फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘फ्लिकर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे. या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा सयाजी शिंदेही यावेळी उपस्थित होता. सरकार यांच्या म्हणण्यानुसार मराठी सिनेमा आशय आणि विषयाच्या बाबतीत जागतिक सिनेमाच्या तोडीचा आहेच, पण त्याला ग्लॅमरची जोड देण्याचा प्रयत्न ‘फ्लिकर’च्या निमित्ताने केला जाणार आहे.


जीवन जगण्याचा अचूक मंत्र

हा चित्रपट मनोरंजनासोबतच जीवन जगण्याचा अचूक मंत्र सांगणाराही असेल. मनाला भिडणारं कथानक, कर्णमधुर संगीत, सहजसुंदर अभिनय, नेत्रदीपक सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवला जाणारा ‘फ्लिकर’ हा सिनेमा मराठी रसिकांसोबतच अमराठी प्रेक्षकांनाही आपलासा वाटणारा ठरेल असा विश्वासही सरकार यांनी व्यक्त केला.


चित्रपटात दिसणार हा नवीन चेहरा

‘फ्लिकर’च्या माध्यमातून राजवीर सरकार हा नवीन चेहरा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. राजवीरच्या जोडीला तन्वी किशोर ही अभिनेत्री या सिनेमात चमकणार आहे. दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पाडावे करीत आहेत. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांच्या जादुई संगीताचा स्पर्श लाभणं हे फ्लिकरचं वैशिष्ट्य ठरेल. या चित्रपटाच्या निमित्ताने इलायराजा यांनी प्रथमच एखाद्या मराठी सिनेमाला पूर्णपणे संगीत दिलं आहे. याशिवाय ‘कोलावरी डी...’ फेम धनुषने या चित्रपटासाठी एक गाणंही गायलं आहे.

‘फ्लिकर’मध्ये संजय मोने, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरूण कदम, गौरव घाटणेकर, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार, प्रभाकर मोरे, सायली जाधव, प्रतिक्षा शिर्के या कलाकारांच्याही भूमिका आहेत.


हेही वाचा - 

शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व गाजवणारे यशवंत देव

जोडी जुळवणाऱ्या ‘गॅटमॅट’चा ट्रेलर लाँच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा