Advertisement

'हे' आहेत संजय जाधवच्या सिनेमातील 'लकी' कलाकार


'हे' आहेत संजय जाधवच्या सिनेमातील 'लकी' कलाकार
SHARES

सध्या सोशल मीडियावर संजय जाधवच्या ‘लकी’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील आठवड्याभरापासून संजयचा ‘लकी’ हा आगामी मराठी सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. याचं मुख्य कारण आहे, या सिनेमाची स्टारकास्ट. तर पाहूया संजयच्या या सिनेमात कोणते कलाकार ‘लकी’ बनले आहेत.


सिनेमाची घोषणा कधी?

बी लाइव्ह प्रॉडक्शन्स आणि ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन निर्मित, संजय कुकरेजा, सूरज सिंग आणि दिपक राणे यांची निर्मिती असलेला ‘लकी’ चित्रपट ७ डिसेंबरला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा २ जुलैला करण्यात आली होती, पण त्यानंतर महिनाभर प्रॉडक्शन हाऊसकडून स्टारकास्टची नावे रिव्हिल करण्यात आली नव्हती.


कुणाचा समावेश?

त्यामुळे या सिनेमाची स्टारकास्ट कशी असेल? याविषयी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होती. अखेर अचानक सोशल मीडियावर एकामागून एक ए-लिस्टर सेलेब्सचे पोस्ट पाहायला मिळाले. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशा मराठी सेलेब्सनी तेच ‘लकी’ असल्याचं म्हटलं.



दुग्धशर्करा योग

एवढी तगडी स्टारकास्ट एका सिनेमात पाहायला मिळणं हा तर दुग्धशर्करा योग मानावा लागेल. एवढ्या कलाकारांना एका सिनेमात आणण्याची कलाकारी पुन्हा एकदा संजयने करून दाखवली आहे. असा मल्टिस्टारर सिनेमा पाहणं, ही तर सिनेरसिकांसाठी पर्वणीच असेल. रोज या सिनेमाविषयी फिल्मइंडस्ट्रीतले एक-एक मोठमोठे सेलेब्स ते लकी असल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.



हेही वाचा-

‘लव्ह सोनिया’ने सजग नागरिक बनवलं : सई ताम्हणकर

‘बॉईज २’च्या टीझरमध्ये ‘बॉईज’चा डबल दंगा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा