Advertisement

'न्यूड'च्या टीमसाठी आनंदाची बातमी


'न्यूड'च्या टीमसाठी आनंदाची बातमी
SHARES

रिलीज होण्यापूर्वीच वादात अडकलेल्या रवी जाधव दिग्दर्शित न्यूड या सिनेमाच्या टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिनेमाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा बहुमान मिळाला आहे. खुद्द रवी जाधव यांनीच ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दिली आहे.


याआधी गोवा इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून न्यूड या चित्रपटाला वगळल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रवी जाधव यांनी सोशल मीडियावरून या विषयी नाराजीही व्यक्त केली होती. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पुर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर रवी जाधव यांच्यासह अनेक सिलेब्रिटींनी या निर्णयावर टीका केली होती.

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग चित्रपट मिळणारा हा पहिलाच चित्रपट आहे. ७ ते १२ मे या कालावधीत इंडो अमेरिकन आर्ट काऊन्सिलचे न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे.

रवी जाधव यांच्या या पोस्टवर आणि न्यूडच्या टीमवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सिनेमाला ए प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. हा सिनेमा २७ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येत आहे. यात राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत आहे. राजश्री बरोबर ओम बुतकर, छाया कदम, मदन देवधर, कल्याणी मुळे दिसणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा