Advertisement

मैत्रीतल्या भावनांची 'ओढ'!


मैत्रीतल्या भावनांची 'ओढ'!
SHARES

मराठी चित्रपट सृष्टीला मैत्री आणि मैत्रीवर आधारीत सिनेमे नवीन नाहीत. अगदी चंद्रकांत-सूर्यकांतपासून ते थेट भरत-सिद्धार्थ जाधवपर्यंत, अशा अनेक 'मैत्रीपूर्ण' जोड्या मराठी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता एका नव्या सिनेमाचं नाव जोडलं जाणार आहे. हा सिनेमा आहे 'ओढ'!सिनेमाची हटके कथा

या सिनेमामध्ये गणेश आणि दिव्या या दोन प्रमुख पात्रांची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र, आधीच्या सिनेमांपेक्षा या सिनेमाची कथा हटके असणार आहे. कथेतली दोन मुख्य पात्र गणेश आणि दिव्या यांच्यातल्या निखळ मैत्रीभोवती कथानक उलगडत जातं.


१९ जानेवारीला होणार सिनेमा प्रदर्शित

गणेश आणि दिव्याच्या मैत्रीचं भावविश्व, त्यात दोघांची होणारी ओढाताण, त्यामुळे मैत्रीत आलेलं वेगळं वळण याची रंजक कथा म्हणजे 'ओढ-मैत्रीतली अव्यक्त भावना'! येत्या १९ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


गणेश-उल्काची नवी जोडी

मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांसोबतच गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. संजाली रोडे, कौतुक शिरोडकर आणि अभय इनामदार यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी आणि जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत.


संबंधित विषय
Advertisement