Advertisement

सावधान! 'राक्षस' येतोय!

जंगल गाणं गातं, ते हसतं ते रडतं. अशा संवादाने 'राक्षस'च्या टीजरची सुरुवात होते. तर दुसरीकडे एक छोटी मुलगी आपल्या आईला वडिलांना राक्षसाने गिळले, असं सांगतेय...

सावधान! 'राक्षस' येतोय!
SHARES

आगामी 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. टीजर बघू सिनेमाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे. ज्ञानेश झोटिंग याने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 'राक्षस' या चित्रपटाची त्याच्या नावामुळे चांगलीच चर्चा झाली. त्यात आता प्रदर्शित करण्यात आलेल्या टीजरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजून वाढली आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकरची जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे.


'राक्षस' नक्की आहे तरी कोण?

टीजरमधून राक्षस ही जंगलात घडलेली, जंगलाभोवती फिरणारी कथा आहे असं दिसतंय. जंगल गाणं गातं, ते हसतं ते रडतं. अशा संवादाने 'राक्षस'च्या टीजरची सुरुवात होते. तर दुसरीकडे एक छोटी मुलगी आपल्या आईला वडिलांना राक्षसाने गिळले, असं सांगतेय. या संवादामुळे चित्रपटाचं गूढ आणखीनच वाढलंय. नेमकं तिच्या वडिलांना काय झालंय? हा 'राक्षस' कोण आहे? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.




जंगलात नेमकं घडलंय काय?

मात्र, या घनदाट जंगलात नेमकं काय घडलंय? हे प्रेक्षकांना येत्या 23 फेब्रुवारीला कळणार आहे. 23 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. शरद केळकर, सई ताम्हणकर यांच्याबरोबर 'राक्षस'मध्ये ऋतुजा देशपांडे, दयाशंकर पांडे, विजय मौर्य, पूर्णानंद वांदेकर आदी कलाकार आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा