Advertisement

३० मार्चला 'ही' मराठी जोडी बांधणार बाशिंग!

‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वत:शी तडजोड करून संसार करणा-या अनेक महिलांच्या मनातील अस्वस्थता ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

३० मार्चला 'ही' मराठी जोडी बांधणार बाशिंग!
SHARES

महिलांचे अनेक प्रश्न आजवर चित्रपटांतून हाताळलेले आहेततसेच मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे सातत्याने येत आहेतअसाच स्त्रीची कथा प्रेक्षकांसमोर आणणारा ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेस्वत:शी तडजोड करून संसार करणा-या अनेक महिलांच्या मनातील अस्वस्थता ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.



काय आहे चित्रपटात?

वयात आलेल्या मुला-मुलींचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ही कथा आहे वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याचीएकमेकांच्या पसंतीने लग्न ठरलेल्या या दोघांच्या आयुष्याला लग्नानंतर अचानक कलाटणी मिळतेया कलाटणीनंतर वर्षा आणि आकाशचं आयुष्य कोणतं वळण घेतं, याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहेवैवाहिक आयुष्यातील समस्यामुला-मुलींच्या अपेक्षात्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

विक्रम गोखलेयतिन कार्येकरसुनील गोडबोलेभक्ती चव्हाणश्वेता खरातसुवर्णा काळे असे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेतयेत्या ३० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



हेही वाचा

असा आहे धकधक गर्लचा 'बकेट लिस्ट'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा