Advertisement

‘तुला पाहते रे’ मालिका चौथ्या स्थानी


‘तुला पाहते रे’ मालिका चौथ्या स्थानी
SHARES

प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं. जे हवं ते मिळालं की, प्रेक्षकही त्याचं कौतुक करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेनं टीआरपीच्या बळावर अवघ्या काही दिवसांमध्येच चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.


01tvshow_31212763_70439876.jpg

अल्पावधीतच केली जादू

१३ आगस्ट रोजी सुबोधची ‘तुला पाहते रे’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू झाली. अनपेक्षित जोडी असूनही त्याच जोडीनं रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अल्पावधीतच ‘तुला पाहते रे’नं रसिकांवर अशी काही जादू केली ही मालिका झी मराठीच्या मालिकांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान झाली आहे. केवळ १८ दिवसांमध्ये ‘तुला पाहते रे’ या मालिकेनं केलेली कामगिरी लक्षवेधी आहे.

297018-tulapahatere.jpg

पटकावलं चौथं स्थान 

एके काळी 'झी मराठी'च्या तक्त्यात आघाडीवर असलेल्या ‘लागीरं झालं जी’ या मालिकेला मागं टाकत ‘तुला पाहते रे’ मालिकेनं चौथं स्थान पटकावलं आहे. या तक्त्यात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ पहिल्या, ‘तुझ्यात जीव रंगला’ दुसऱ्या, ‘चला हवा येऊ द्या’ तिसऱ्या स्थानी आहे. हे चित्र पाहून बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेल्या सुबोध भावेने पुन्हा एकदा रसिकांवर मोहिनी घातल्याचं दिसतं. या मालिकेत सुबोधच्या जोडीला गायत्री दातार मुख्य भूमिकेत आहे. वयाने मोठा असलेला नायक आणि लहान वयातील नायिका हा फार्म्युला पुन्हा एकदा रसिकांवर लागू पडला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा