स्वप्नील मुक्ताला म्हणतो, आई तू बाबा मी होणार गं...

डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित 'मुंबई पुणे मुंबई-३' या चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं रसिकांच्या मनात रुंजी घालू लागलं आहे. नुकतंच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित केलं आहे.

स्वप्नील मुक्ताला म्हणतो, आई तू बाबा मी होणार गं...
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीतील मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांची फेव्हरेट बनलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'मुंबई पुणे मुंबई'च्या दोन भागांच्या यशानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटातील एका गाण्यात स्वप्नील मुक्ताला म्हणतो की,  'आई तू बाबा मी होणार गं...'इतिहास रचला

डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित 'मुंबई पुणे मुंबई-३' या चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं रसिकांच्या मनात रुंजी घालू लागलं आहे. नुकतंच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित केलं आहे. यावेळी संपूर्ण कलाकारांची टीम आणि या चित्रपटाची हीट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे उपस्थित होती. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला गेला आहे. 


पहिलाच मराठी चित्रपट 

पाच वर्षांपूर्वी आलेल्या 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटाचा हा तिसरा भाग प्रदर्शित होत असून अशा पद्धतीने तीन भागात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 'मुंबई पुणे मुंबई-३'च्या माध्यमातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे साकारात असलेल्या जोडीच्या आयुष्यातील महत्वाचा तिसरा टप्पा प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतर कोणत्याही जोडीच्या आयुष्यात असतात तसेच टप्पे या जोडीच्या आयुष्यात असल्याने ही जोडी आणि त्यांची कथा पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार आहे. 


बेबी शॉवर 

हे गाणे पारंपारिक डोहाळ जेवण (आता त्याला बेबी शॉवर असंही म्हणतात) समारंभातील असून ते चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यावर घराघरात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...' हे गाणं हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायलं आहे. या गाण्याला संपूर्ण नवा साज असून कानाला भावेल असं संगीत निलेश मोहरीर यांनी दिलं आहे. देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी हे गाणं लिहिलं आहे.


गाणं एमपीएम ३ तंत्रावर

सतीश राजवाडे या गाण्याबाबत म्हणाला की, “डोहाळ जेवण ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरी होणारी एक जुनी परंपरा आहे. हल्ली त्याला 'बेबी शॉवर' म्हटलं जातं. हे गाणं एमपीएम-३ या तंत्रावर संपूर्णतः वेगळ्या पद्धतीनं साकारलं आहे. या गाण्यामध्ये जो खेळ खेळला गेला आहे, तो आम्ही राजवाडे कुटुंब कार्यक्रमासाठी एकत्र आलो की खेळत असू. मोठ्या एकत्र कुटुंबात हे समारंभ साजरे करायला खूप मजा येते. माझी खात्री आहे कि हे गाणं एक नवीन ट्रेंड सुरु करेल.हेही वाचा - 

सर्वांचा लाडका पिकाचू डिटेक्टीव्हच्या भूमिकेत

'टिळक आणि आगरकर'सोबत रंगभूमीवर अवतरणार 'वाजे पाऊल आपुले'
संबंधित विषय