सर्वांचा लाडका पिकाचू डिटेक्टीव्हच्या भूमिकेत


SHARE

आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी 'पोकिमॉन' हे कार्टून नक्कीच पाहिलं असेल. सर्वात लोकप्रिय कार्टून अशी याची ओळख आहे. या कार्टूनवर आधारीत मोबाईल गेमही आला. या गेमनं तर अक्षरश: तरुणाईला वेड लावलं होतं. आता याच पॉकिमॉनवर आधारित चित्रपटही लवकर येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चरनं ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच केला आहे. आतापर्यंत कार्टुनमध्ये पाहिलेला पिकाचू या चित्रपटात हेरच्या भूमिकेत दिसणार आहे.पॉकिमॉन ट्रेनर 

 'डिटेक्टीव्ह पिकाचू'मध्ये मूळ पॉकेमॉन सीरिजमधले अनेक पॉकिमॉन पाहता येणार आहेत. ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’ची कथा ही टीम गुडमन या पॉकिमॉन ट्रेनर भोवती फिरते. पेशानं हेर असलेले टीमचे वडील कार अपघातानंतर अचानक नाहीसे होतात. त्यांचा शोध घेत टीम एका शहरात येतो आणि इथेच त्याची भेट पिकाचूशी होते. हे दोघंही एकत्र येत टीमच्या वडिलांचा शोध घेतात या कथेवर ‘डिटेक्टीव्ह पिकाचू’ आधारलेला आहे. लोकप्रिय अभिनेता रायन रेनॉल्ड यांनी पिकाचूला आवाज दिला आहे. तर रॉब लेटरमननं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून जस्टीस स्मिथ टीमच्या भूमिकेत आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या