Advertisement

नागराज-झी चा नवीन चित्रपट ‘नाळ’

नागराजने ‘नाळ’चं दिग्दर्शन केलेलं नसून, झी सोबत केवळ या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी सांभाळली आहे. याखेरीज नागराजने या चित्रपटासाठी संवादलेखनही केलं आहे.

नागराज-झी चा नवीन चित्रपट ‘नाळ’
SHARES

दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजचं नातं खूप जुनं आहे. नागराजने ‘फँड्री’ हा आपला पहिला मराठी सिनेमाही झी सोबतच केला आणि सुपरहिट ‘सैराट’ही. बॅाक्स आॅफिसवर यशस्वी ठरलेल्या या दोन चित्रपटांनंतर ही जोडी नवं काय घेऊन येणार आहे याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकत्र आले आहेत. ही जोडी आता ‘नाळ’ हा मराठी चित्रपट घेऊन येत आहे.


नागराजचं संवादलेखन

नागराजने ‘नाळ’चं दिग्दर्शन केलेलं नसून, झी सोबत केवळ या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी सांभाळली आहे. याखेरीज नागराजने या चित्रपटासाठी संवादलेखनही केलं आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी ‘नाळ’चं दिग्दर्शन केलं आहे. आटपाट आणि मृद्गंध फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. दिग्दर्शक सुधाकर यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असून छायालेखनही केलं आहे.


१६ नोव्हेंबरला प्रदर्शित

मातीतील कथा आणि बोलीभाषेतील संवाद ही नागराजच्या चित्रपटांची खासियत राहिली आहे. त्यामुळे ‘नाळ’चं दिग्दर्शन जरी सुधाकर यांनी केलेलं असलं तरी या चित्रपटातील संवादांच्या माध्यमातून नागराजच्या लेखणीची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. टीझरमधील निसर्गसौंदर्य, लोकेशन, नदी पाहिल्यावर या चित्रपटावरही नागराजची छाप असल्याचं जाणवतं. नागराज आणि सुधाकर यांच्यासह विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन वैद्य, प्रशांत पेठे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १६ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

'एक सांगायचंय...' म्हणत प्रथमच एकत्र आले केके-राजेश्वरी 

Exclusive : वॅाचमन बनला नायक-दिग्दर्शक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा