Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चा फर्स्ट लुक

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित 'धप्पा' या चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. फर्स्ट लूकमध्ये काही लहान मुलं गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर घोळका करून बसल्याचं दिसतं. तिथे काही भगवे झेंडे, क्रॉस, झाडे दिसत आहेत.

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चा फर्स्ट लुक
SHARES

'धप्पा' म्हणजे काय हे कदाचित आजच्या पिढीतील मुलांना समजणार नाही. बालपणी जे लपाछपी खेळले आहेत त्यांना 'धप्पा' म्हणजे काय ते सांगण्याची गरज नाही. ज्यांना हे ठाऊक नाही, त्यांनाच 'धप्पा' देणारा एक मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं शीर्षकच 'धप्पा' असं आहे. राष्ट्रीय पारितोषिकाला गवसणी घालणाऱ्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे.


निरागसतेतून धाडस

लहानपणी लपाछपी खेळताना तुम्हाला किती वेळा 'धप्पा' मिळालाय? किंवा तुम्ही इतरांना किती वेळा 'धप्पा' द्यायचा हे आठवते का? लहानपणीचे ते दिवस किती सुंदर होते याची आठवण आपल्या मनात कुठेतरी घर करून बसलेली असते. आपण मोठे होतो तशी आपल्यातील ही निरागसता हरवून बसतो. प्रश्न विचारण्याचं धाडस हरवून बसतो. 'चलता है यार' किंवा 'हे असंच असतं' अशी काहीशी उत्तरं दररोजच्या समस्यांना मिळताना दिसतात. तीच बालपणीची निरागसता, त्या निरागसतेतून आलेलं धाडस निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'धप्पा' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.


नेमकं काय?

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित 'धप्पा' या चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. फर्स्ट लूकमध्ये काही लहान मुलं गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर घोळका करून बसल्याचं दिसतं. तिथे काही भगवे झेंडे, क्रॉस, झाडे दिसत आहेत. यामुळे 'धप्पा'मध्ये नेमकं काय आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे. 


१ फेब्रुवारीला प्रदर्शित 

गिरीश पांडुरंग कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'धप्पा' या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत. या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' राष्ट्रीय एकात्मता) पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे. तसंच भारत सरकारच्यावतीने आयोजित इंटरनॅशन फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग झालं आहे. 'धप्पा' चित्रपटामध्ये काय दडलं आहे? कोणते कलाकार आहेत? हे लवकरच समजणार आहे. हा चित्रपट १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा - 

चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन

'नशीबवान' भाऊची 'भिरभिरती नजर...'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा